स्टोरी

सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध- सावळाराम अणावकर: प्रसंगी व्यापक लढा उभारण्याची ताकद संघटनेत

Spread the love

सावंतवाडी(म.ल. देसाई):सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढा उभारायचा झाल्यास व्यापक लढा उभारण्याची ताकद आमच्या संघटनेत आहे ,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी मणेरी येथे केले. जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध असून, गरज पडल्यास या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी मोठा लढा उभारू, असा निर्धार व्यक्त करून अणावकर यांनी जिल्हास्तरीय सर्वसाधारण सभेला तीन साडेतीनशे सभासदांची उपस्थिती असणे ही अभूतपूर्व बाब आहे असे म्हटले.यावेळी अणावकर यांनी नेटक्या नियोजनाबद्दल तालुका कार्यकारिणी प्रतिनिधी गुरुदास कुबल आणि कार्यकारिणीचे कौतुक केले.

संघटना वाढीसाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची गरज: दळवीजिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी म्हणाले की, संघटना वाढीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे.किमान प्रत्येकाने संघटनेसाठी वेळ द्यायला हवा,तसेच जे आर्थिक मदत करू शकतात त्यांनी खारीचा वाटा उचलायला हवा.अनेकदासंघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीसाठी पैशांची गरज भासते,अशावेळी सदस्य शुल्कामधील किमान ५० टक्के रक्कम जिल्ह्याकडे जमा व्हायला हवी,असेही दळवी यांनी नमूद केले. म .ल. देसाई यांनी सर्व सदस्यांनी संघटना . वाढीसाठी प्रयत्न करूया ,सामान्य लोकांचे प्रश्न सोडवूया संघटना आपोआपच वाढेल असे सांगितल,आठही तालुक्यातील शाखा मजबूत करूया .,तंत्रस्नेही शिक्षकांचा उपयोग संघटना वाढीसाठी करूया व जिल्हा स्तरावर जास्तीत जास्त भेटी देण्याची विनंती जिल्हा कार्यकारणीला केली . जे शिक्षक जानेवारी ते मे मध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत .त्यांचा प्रश्न न्यायालया मुळे प्रलंबित आहेत . त्या प्राथमिक शिक्षकांना लवकरच असोशियशन न्याय मिळवून देईल . असे सांगितले.

यावेळी खजिनदार ना. य. सावंत ,सचिव सुंदर पारकर,सदस्य कृष्णा पाताडे,रुद्राजी भालेकर, औदुंबर मर्गज मनोहर खामकरकिशोर नरसुले,सुरेंद्र देसाईमनोहर जोगलसरिता मुननकर,गुरुदास कुबल,फटजी नाईक,जनार्दन तेली यांच्यासह मधुकर बोर्डवेकर, भाई वालावलकर,चंद्रसेन पाताडे, नरसुले, म. ल.देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र देसाई,तालुकाध्यक्ष एल. बी. सावंतसचिव मोहन पारकरउपाध्यक्ष गजानन वाडकर,श्रीराम सिनारी,भाऊराव टेंबकर,भास्कर सावंत,प्रकाश देसाई, गो. ल.नाईक, विष्णू खांबल,सखाराम देसाई आदी उपस्थित होते.सुंदर पारकर यांनी संघटनेच्या आर्थिक हिशोबाचा तपशीलवार लेखाजोखा सादर केला. ना. य.सावंत यांनी सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहिल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली.ईशस्तवन, स्वागत गीत अनिता आसोलकर व आणि इतर शिक्षिका सदस्यांनी सादर केले.मिलिंद नाईक यांनी हार्मोनियमवर संगीत साथ दिली . यावेळी मान्यवरांच्या हस्ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण झालेल्या शिक्षकांपैकी चंद्रकांत चव्हाण व प्रकाश देसाई यांच्यासह सदाशिव पाटगावकर यांचा पुरस्कारप्राप्त कथेसाठी आणि सर्व तालुक्यातील अध्यक्ष,सचिव यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दिवंगत निवृत्त शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सभेमध्ये संघटनेच्या मागील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जुन्या अहवालासह नवीन ठरावांना मंजुरी देण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या समस्यां सोडवणुकीसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गुरुदास कुबल, भाऊराव टेंबकर,श्रीराम सिनारी,सुरेंद्र देसाई, विष्णू खांबल,तसेच दोडामार्ग तालुका कार्यकारिणीने सभा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.कुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Spread the love

Related posts

गोळवण येथे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न ! बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा शाखेचे आयोजन

news

मसुरे या नावासाठी नवतरुण मित्र मंडळ चांदेर यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार.

news

बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या घावनळे येथील तुकाराम म्हापणकर या वृद्धाला सामाजिक बांधिलकीचा आधार…!

news

Leave a Comment