स्टोरी

सिंधुदुर्गातील अभाअनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतले भांडाफोड प्रशिक्षण.

Spread the love

मालवण वार्ताहर: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सेवाग्राम वर्धा येथे नुकतेच राज्यातील सक्रिय कार्यकर्त्यांसाठी प्रा . श्याम मानवांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसाचे भांडाफोड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते..या शिबिरात सहभागी होण्यासाठी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सक्रिय कार्यकर्ते उज्वला येळावीकर, स्नेहा महाडिक, यशवंत भोसले, महेंद्र कदम, जयराम डामरे, विजय जाधव, श्रीकांत नार्वेकर सहभागी झाले होते. या प्रशिक्षण शिबिरात प्रा. श्याम मानव सरांनी समिती स्थापनेपासून केलेल्या भांडाफोडीची थोडक्यात माहिती दिली .तसेच भांडाफोड म्हणजे काय? भांडाफोडीची पूर्व तयारी कशी करावी? भांडाफोडीचे प्रकार कोणते? भांडाफोडीसाठी उपयुक्त साधने कोणती? माहिती कशी मिळवायची ? ती कशी संकलित करावयाची ? भांडाफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांची वैशिष्ट्ये काय असावीत ? प्राधान्यक्रमाने प्रथम भांडाफोड कोणते करावयाचे? भांडाफोड करताना घ्यावयाची काळजी , ज्योतिषांचे भांडाफोड करताना घ्यावयाची काळजी, जादूटोणा विरोधी कायद्यामधील तरतुदी, औषधी व चमत्कारी उपचार कायद्यामधील तरतुदी, एखाद्या भोंदूबाबाने आवाहन स्विकारल्या नंतर कोणती प्रक्रिया राबवायची , कोणती आवाहने स्विकारु नयेत, भानामती कशी ओळखावी, त्याचे प्रकार कोणते,भोंदू बाबांकडून स्त्रियांचे होणारे शोषण कसे थांबवावे इत्यादीचे सखोल मार्गदर्शन प्रा श्याम मानव सरांनी केले होते . या शिबिरात देशभरातील दिडशे सक्रिय कार्यकर्त्यांनाच सहभागी करून घेण्यात आले होते .

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भोंदूबाबांचे प्रमाण वाडीवस्तीत वाढत असून त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेचे शोषण कसे थांबविता येईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची भांडाफोड जिल्हा म्हणून कशी ओळख होईल या साठी पुढील काळात शिबिरात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्यात येईल व जास्तीत जास्त भोंदूबाबांचे भांडाफोड करण्यात येईल असे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे . तरी सुजाण नागरीकांनी आपआपल्या परिसरात आपल्यात अलौकिक शक्ती आहे, मी कोणाचा तरी अवतार आहे, मला भूत, भविष्य, वर्तमान ओळखता येते, त्यावर उपाय सांगता येतात, मला अनेकांचे रोग निदान करता येते, त्यावर उपायही करता येतात असे दावे करणारे भोंदूबाबा आपल्या परिसरात असतील तर त्याची माहिती नजिकच्या पोलिस ठाण्यात अथवा अभाअंनिसच्या कार्यकर्त्यांना द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे .


Spread the love

Related posts

सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन.

प्रसाद परब

आजगांव येथे “गुरूवंदना २०२३” संगीत सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न!

news

महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग अध्यक्षपदी सिंधू कन्या ज्योतिका दीपक हरयाण …

news

Leave a Comment