सनातन

नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरातअनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!

Spread the love

सावंतवाडी (संतोष परब): नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे ‍विशेष आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत अनेक शहरांमध्ये हिंदु युवती आणि महिलांसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येत असून महिला-सुरक्षेविषयी जनजागृती करणारे विविध व्हिडिओ, तसेच प्रेरणादायी शौर्य गीत प्रसारित करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देतांना श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, आज युवतींना छेडछाड, पाठलाग, ऑनलाईन त्रास, लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, तसेच हिंसक हल्ले यांसारख्या विविध धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही परधर्मीय लोक खोटे नाव आणि खोटी ओळख सांगून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून त्यांचे शारिरीक शोषण करतात. पुढे या लव्ह जिहादच्या घटनांमध्ये ब्लॅकमेलिंग किंवा धर्मांतरासाठी दबाव आणला जातो. याबाबत युवतींमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भीती नव्हे, तर जागरूकता, आत्मविश्वास आणि स्वरक्षणाचे कौशल्य निर्माण करण्यासाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान राबवण्यात येणार आहे. या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांमध्ये शारीरिक प्रतिकाराचे तंत्र शिकवण्याबरोबरच संकटाची चाहूल ओळखणे, योग्य वेळी निर्णय घेणे, तसेच मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खंबीर रहाण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण वर्गांमध्ये १५ ‌वर्षांवरील युवतींसाठी प्रवेश दिला जाणार आहे. हिंदु जनजागृती समितीने अधिकाधिक हिंदु युवतींनी या अभियानात सहभागी होऊन ‍विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी आपल्या शहरातील ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानात सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला क्यू-आर कोड (QR Code) स्कॅन करून अथवा खालील लिंक वर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी पहा – www.hindujagruti.org/hindi/navratri-festival आपला नम्र,श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : ९९८७९ ६६६६६

QR Code : ‘मैं हूँ दुर्गा’ वर्गात सहभागी होण्यासाठी वरील क्यू-आर कोड (QR Code) स्कॅन करा !


Spread the love

Related posts

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ‘श्री महाधन्वन्तरि याग’ भावपूर्ण वातावरणात संपन्न!

news

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबत नाही तोपर्यंत भारत-बांगलादेश क्रिकेट सामने रद्द करा !

news

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ हाणून पाडू..! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांचा इशारा

प्रसाद परब

Leave a Comment