स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेश मस्के यांना पुरस्कार जाहीर.

Spread the love

मालगुंड: महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या आणि मागील अनेक वर्षे मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती व साहित्य चळवळ वृंद्धिगत व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे सन २०२४ – २५ या वर्षांचे वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कारासाठी विहित कालावधीतील प्रस्ताव मागितले जातात. त्यानुसार आलेल्या प्रस्तावांची मान्यवर व जाणकार परिक्षकांकडून छाननी करून, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार हे पुरस्कार जाहीर केले आहेत. सन २०२४ – २५ चे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

कादंबरी विभागात प्रथम क्रमांकाचा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार विवेक गोविलकर यांच्या सिंफनी तर द्वितीय क्रमांकाचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार उदय जोशी लिखित संघर्षपर्व कादंबरीसाठी, कथा विभागात प्रथम क्रमांकाचा वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार स्टिफन परेरा यांच्या काळवेळ तर द्वितीय क्रमांकाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार अशोक लोटणकर यांच्या निराधार कथासंग्रहाला, कविता विभागात प्रथम क्रमांकाचा आरती प्रभू स्मृती पुरस्कार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उडवाच मान माझी, तर द्वितीय क्रमांकाचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार विलास गावडे यांच्या व्यक्त होतोय मी या कवितासंग्रहाला, आत्मचरित्र विभागात प्रथम क्रमांकाचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार आनंद इंदिरा श्रीधर सांडू यांच्या क्षण सोनेरी – रुपेरी आणि काटेरी या संग्रहास, चरित्र विभागात श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार शामसुंदर गावकर यांच्या भरती – ओहोटी या चरित्रास, समीक्षा विभागात प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. शिल्पा जोशी यांच्या मंगेश पाडगावकरांचे गीत – काव्य या ग्रंथास, नाटक विभागाचा भाई भगत पुरस्कार अरुण तुकाराम मोर्ये यांच्या कृष्णा माझं काय चुकलं या नाटकास, तर ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार वर्षा कुवळेकर यांच्या सफर खूबसुरत है मंजिलसे या ललित ग्रंथास तर द्वितीय क्रमांकाचा सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे स्मृती पुरस्कार नितीन तेंडुलकर यांच्या अधिक उंच उडता उडता या साहित्यकृतीस, बालवाङमय विभागाचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या शशा रे सशा या ग्रंथास, संकीर्ण विभागातील प्रथम क्रमांकाचा वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या कातळशिल्पांच्या पाऊलखुणा तर द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार रविराज गंधे यांच्या महासागर या ग्रंथास आणि वैचारिक विभागासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार रेखा कोरे यांच्या महात्मा बसवेश्वर – कृतीतून प्रगतीकडे या ग्रंथास मिळाला आहे. तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे कादंबरी, कथासंग्रह, संकीर्ण विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे डंकी रूट साठी प्रकाश पाटील यांना, ऍडजस्टमेंट साठी मेघना साने यांना, तिमिरातून तेजाकडे साठी डॉ. जिवबा केळुसकर तर संपादन विभागाचे विशेष पुरस्कार अनुक्रमे वलयांकित चंद्र साठी उज्ज्वला चंद्रशेखर धानजी, आठवचित्रे साठी प्रज्ञा जांभेकर यांना जाहीर झाले आहेत. यासोबतच वाड्मयेतर पुरस्कारांमध्ये कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे प्रसिद्ध कवी तथा गीतकार प्रविण दवणे, मुंबई, पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण, आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार दहिसर येथील विद्याभूषण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक नर यांना तर संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुरारी तथा बंधू मयेकर यांना, गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेश आत्माराम मस्के व ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तुकाराम विठ्ठल तथा बाळ कांदळकर यांना, राजा राजवाडे स्मृती वाड्मयीन कार्यकर्ती पुरस्कार मुंबईच्या पुष्पा कोल्हे व मालगुंड शाखेच्या शुभदा मुळ्ये, वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार मुंबई जिल्ह्यातील चेंबूर व रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा शाखेस, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार रायगडच्या संध्या दिवकर व सिंधुदुर्गच्या स्नेहा फणसळकर यांना, तर महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थिनींला दिला जाणारा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार पालघरच्या संस्कृती महेंद्र तांडेल यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृति काव्य पुरस्कार मालगुंडचे अमेय धोपटकर यांना आणि युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याचे प्रविण सोनावणे यांना जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वाङमयीन व वाड्मयीन पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. सन २०२४ – २५ मधील सर्व पुरस्कार प्राप्त सर्वांचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

news

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ?

news

सावंतवाडी एसटी बस स्थानकाच्या परिसरातील सर्व प्रकरच्या कामाची सुरुवात!

news

Leave a Comment