स्टोरी

मळगाव येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त उत्कृष्ट वाचक सन्मान सोहळ्याचे आयोजन.

Spread the love

मळगाव (दीपक पटेकर): मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ व ‘उत्कृष्ट वाचक सन्मान २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता वाचन मंदिराच्या ‘रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. सचिन श्रीरंग धोपेश्वरकर, सावंतवाडी हे उपस्थित राहणार आहेत.सन २०२५-२६ या वर्षभरात ग्रंथालयाच्या आजीव, साधारण आणि बाल वाचक गटातून सर्वाधिक वाचन करणाऱ्या वाचक सभासदांची उत्कृष्ट वाचक म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.वाचन संस्कृती वाढावी आणि वाचकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.तरी या कार्यक्रमास सर्व ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी, हितचिंतक आणि ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव तर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

news

मुणगे जत्रोत्सवात सप्तसुरांचा संगम…! शालेय विध्यार्थ्यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

news

नौदल दिनाच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या मालवणवासीयांना महत्वाच्या सूचना नागरिकांनी सूचनांचे पालन करावे

news

Leave a Comment