कणकवली, ०९ सप्टेंबर (संतोष परब): प्रवासी जलवाहतूक ही केवळ श्रीमंतांपुरता मर्यादीत न ठेवता सर्वसामान्य नागरिकांसाठीलवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी सावरकरांच्या विचारांवर चालणाऱ्या व पूर्णपणे सामाजिक विषयांवर केंद्रीत अशा ‘सावरकरवॉरियर्स’ या अशासकीय संस्थेचे प्रमुख तथा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष श्री. रणजित सावरकर आणि हिंदू विधीज्ञपरिषदेचे श्री. विक्रम भावे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केली. ‘सावरकर वॉरियर्स’ आणि ‘हिंदू विधीज्ञ परिषद’ यांच्या वतीने कणकवली येथील शासकीय अतिथीगृहात ही संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदू जनजागृती समितीचे श्री.हेमंत मणेरीकर, श्री.राजेंद्र पाटील, सनातन संस्थेचे सद्गुरू सत्यवान कदम उपस्थित होते.या वेळेस बोलतांना हिंदू विधिज्ञ परिषदेचे श्री. भावे म्हणाले की खरेतर हवाईमार्ग, लोहमार्ग आणि रस्ते वाहतूक यांच्यापेक्षा जलमार्गअधिक स्वस्त आणि पर्यावरण पुरक आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालानुसार रस्ते वाहतुकीचा खर्च प्रतीकिलोमिटर – प्रतीटन३.७८ रुपये, रेल्वे वाहतुकीचा खर्च प्रतीकिलोमिटर प्रतीटन १.९६ रुपये आणि जल वाहतुकीचा खर्च प्रतीकिलोमिटर – प्रतीटन १.८० रुपयेइतका अल्प आहे. त्यामुळे केवळ रस्त्यांची कंत्राटे निघणे बंद होईल म्हणून बोट सेवेचा विचार मागे ठेवला जातो आहे का? शिवायरेल्वेप्रवासावर अनुदान असते म्हणून तो सर्वसामान्य जनतेला स्वस्त पडतो, निदान काही काळ या जलप्रवासालाही तसे अनुदान देता येईल,कारण त्यात रेल्वेचे रुळ, प्लॅटफॉर्म इत्यादींचा खर्च वाचतो किंवा रस्ते बनवणे, रुंदीकरण, मेंटेनन्स इत्यादींचा खर्च वाचतो त्यामुळे हे अनुदानदेणे अथवा शासनाने बोटसेवा स्वतः सुरु करणे (शासकीय कंपनीने हा उपक्रम सुरु करणे) सुद्धा परवडू शकते असे मत श्री. भावे यांनी व्यक्त केले.
‘सावरकर वॉरियर्स’ चे प्रमुख आणि गांधीहत्येवर संशोधन करून Make Sure Gandhi is Dead हे पुस्तक लिहिणारे श्री.रणजीत सावरकर या वेळी म्हणाले की, ‘इंग्रजांनी त्यांचा व्यापार चालवण्यासाठी व वाढविण्यासाठी जलमार्गाचा पुरेपूर वापर केला. परंतुकोकणातील क्रांतीकारी विचारांचे लोक मुंबईच्या जवळ देखील येऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रवासी जलवाहतूक सक्षम होऊ दिली नाही.आताचे शासन देखील इंग्रजाच्या पावलावर पाऊल टाकत आहे.’ श्री. रणजित सावरकर यांनी पुढे बोलतांना असे मत व्यक्त केले की,’कोकण रेल्वेची मागणी मुळात कोकणवासियांच्या आंदोलनानंतर मार्गी लागली होती. कोकणातून मुंबईत स्थायिक झालेल्या नागरिकांचीसंख्या १५ लाखांच्या आसपास आहे. गणेशोत्सव आणि यात्रांच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या नागरिकांची संख्या १० ते १२ लाखांच्याआसपास आहे. हे सर्व नागरिक सण व उत्सवांसाठी कोकणात येतांना रेल्वे, एस. टी. बसेस तसेच खाजगी बसेस व खाजगी गाड्या यांचावापर करतात. कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या या अन्य राज्यांतून येणाऱ्या असतात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाआरक्षण मिळणे कठीण जाते. विना आरक्षीत प्रवास हे तर मोठे दिव्यच असते. विशेष रेल्वे गाड्या सोडूनही उत्सव काळात रस्तेवाहतुकीवरही प्रचंड ताण असतो. त्यामुळे प्रवासी जलवाहतूक हा सगळ्याच दृष्टीने उत्तम पर्याय आहे. शिवाय बंदरांचा विकास झाल्यासकोकणातील पर्यटन, बाजारपेठ विकास आणि दळणवळण अशा सर्वच दृष्टिने याचा लाभ होईल. शेजारच्या गुजरात सारख्या राज्यात हाजिराते घोघा ही प्रवासी जलवाहतूक यशस्वीपणे चालत आहे. सागरी किनारा लाभलेले अनेक देश आज प्रवासी जलवाहतूक यशस्वीपणेचालवत आहेत. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी ‘कोकण शक्ती’ ‘कोकण सेवक’ ‘दमानिया कॅटामरीन’ यांसारख्या प्रवासी जलवाहतूक सेवाहोत्या. मात्र अन्य क्षेत्रात प्रगती करणारा महाराष्ट्र या क्षेत्रात मात्र मागे पडला आहे, असे दिसते. ‘हा विषय गंभीर असून सुराज्य अभियानाच्या वतीने आम्ही हा मुद्दा लावून धरू, असे आश्वासन यावेळी ‘सुराज्य अभियान’चे डॉ.रविकांत नारकर यांनी दिले.
