स्टोरी

रामगड पोस्ट ऑफिस समस्या तातडीने सोडवा.. ¡ शुभम मटकर यांची मागणी.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: रामगड येथील पोस्ट ऑफिस मध्ये गेले अनेक दिवस ग्रामस्थांना विविध अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबतरामगड पोस्ट ऑफिस च्या सेवांमधील येणाऱ्या अडचणी संदर्भात पोस्ट ऑफिस चे जिल्हा अधीक्षक श्री एन टी कुरळपकर यांच्याशी रामगड सरपंच श्री शुभम मटकर यांनी रामगड पोस्ट ऑफिस येथे भेट घेत चर्चा केली. या ठिकाणी निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत संबंधित अधिकारी वर्गाशी सरपंच शुभम मटकर यांनी चर्चा विनिमय करत सर्व समस्यांबाबत लक्ष वेधले. रामगड पोस्ट ऑफिस येथे निर्माण झालेल्या समस्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे जिल्हा अध्यक्ष एन टी कुरळपकर यांनीसांगितले अशी माहिती सरपंच शुभम मटकर यांनी दिली.. रामगड पोस्ट ऑफिस मधील बीएसएनएल लीज लाईन प्रस्ताव बरेच महिने प्रलंबित असून त्यामुळे ग्रामस्थांना पोस्ट ऑफिस च्या चकरा मारव्या लागत आहेत.श्री कुरळपकर यांनी सदर प्रस्ताव दिल्ली ऑफिस ला प्रलंबित आहे व त्या बाबतचा पाठपुरावा चालू असल्या बाबत सांगितले तसेच बीएसएनएल व खाजगी पुरवठादार यांच्या मधे करार झाल्यास लगेच इंटरनेट पुरवणे शक्य असल्याचे सांगितले.त्या साठी जिल्हा स्तरावरून प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.रामगड सारख्या ग्रामीण भागात आर्थिक उलाढाली साठी पोस्ट ऑफिस अतिशय महत्वाचे असल्याने त्याचे इंटरनेट सुरळीत करण्यावर अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती या प्रसंगी सरपंच श्री शुभम मटकर यांनी केली.


Spread the love

Related posts

प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा  उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा..! इन्सुली बिलेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

शिंदे फडणवीस सरकारद्वारा वीज बिलामध्ये वाढ

news

जि. प. शाळा पळसंब नं १ च्या विद्यार्थ्याना मदतीचा हात!

news

Leave a Comment