स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांच्याकडून कौतुक.

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव):स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून दिव्यांग विद्यार्थ्यांनसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे त्यांना खाऊ व भेटवस्तू दिली जाते. या उपक्रमासाठी संस्थेच्या सदस्या रूपा मुद्राळे नेहमी पुढाकार घेत असतात त्यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री सतीश बागवे व संस्थेचे पदाधिकारी सहकार्य करतात. या उपक्रमासाठी सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम व पुरवठा अधिकारी दिपाली गोटे उपस्थित होत्या. संस्थेच्या अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांचे त्यांनी कौतुक करून आपणही या संस्थेचा एक भाग बनायला तयार आहे असे त्यांनी सांगितले. तर माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांनी आपले ही या मुलांसाठी नेहमी सहकार्य असेल असे सांगून मुलांच्या खाऊसाठी पाच हजार रुपये दिली. संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे म्हणाले की दिव्यांग मुलांच्या पाठीशी आमची संस्था खंबीरपणे नेहमीच उभी आहे तर निरीक्षक राजेंद्र मगदूम व दिपाली गोटे यांनी आपले हि नेहमी सहकार्य असेल असे सांगितले. त्याचप्रमाणे सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये संस्थेच्या माध्यमातून सर्व पोलीस वर्गाला जलेबी व गुलाब देऊन सन्मानित करण्यात आले व पोलीस स्टेशन साठी टेबल व पाण्याची स्टीलची ग्लासे भेटवस्तू म्हणून देण्यात आली यासाठी संस्थेच्या रूपा मुद्राळे यांनी पुढाकार घेतला.

याप्रसंगी या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पुरवठा अधिकारी दिपाली सचितानंद गोटे, पोलीस अमित राऊळ, निरवडेकर तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, हेलन निबरे, लक्ष्मण कदम, रवी जाधव तसेच प्रशिक्षिका विदिशा सावंत, द्रोपती राऊळ, एम एस डब्ल्यूच्या गीता वेडगे, पालक शालिनी राणे अर्चना भोगम उपस्थित होत्या.


Spread the love

Related posts

परशुराम गोरे यांचे निधन.

news

ब्रेकिंग न्यूज…! सांगेली येथील एका विद्यालयात शिकत असणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा.

news

आचिर्णे येथे श्री रासाईदेवी यात्रोत्सव २५ जानेवारी रोजी होणार…! विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

Leave a Comment