स्टोरी

रिक्षा पलटी झाल्याने मुंबईतील युवक जखमी..! पोलीस पि.के. कदम व सामाजिक बांधिलकीची तात्काळ मदत.

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव): काल सायंकाळी आठ वाजता अनिकेत मोरये मुंबई वय 38 सावंतवाडी वरून रिक्षाने रेल्वे स्टेशन कडे जात असताना मळगाव मेठा मध्ये रिक्षा पलटी होऊन त्यांचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या डाव्या हाताचे तीन ठिकाणी हाडे मोडली. त्याच वेळी त्या मार्गावरून जात असलेले पोलीस पि.के. कदम यांनी स्वतःच्या गाडीमध्ये घालून त्यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयमध्ये उपचारासाठी दाखल केले व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्याशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली. तसेच उपचारादरम्यान लागणारे औषध साहित्य देखील त्यांनी स्वखर्चाने आणले. मुंबईवरून ते सावंतवाडी कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कोणी नसल्यामुळे आपण मुंबई येथे जाऊन ऑपरेशन करून घेतो असा निर्णय घेतला असता. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी स्टेशन मास्टर दिनेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून सदर अपघातग्रस्ताला रेल्वेची एक सीट उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता त्यांनी तत्काळ एक सीट त्यांना उपलब्ध करून दिली. संस्थेचे कार्यकर्ते लक्ष्मी कदम यांनी स्वखर्चाने रिक्षेत बसवून त्यांना सुखरूप रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचवले नंतर ते सुखरूप मुंबईमध्ये पोचून आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याचे कळवले आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम तसेच पोलीस कदम यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Spread the love

Related posts

कलंबिस्त गावातील राघवेंद्र तावडे यांच्या घरावर पडलेल्या विजेच्या पोलाकडे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

प्रसाद परब

महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार या प्रशालेच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश!

news

तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्या तीन साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा झाला सन्मान

प्रसाद परब

Leave a Comment