स्टोरी

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र गावडे यांचा सन्मान.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी चौकुळ सावंतवाडी येथील आरएसएस ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. राजेंद्र गावडे यांचा साखळी गोवा येथे एका कार्यक्रमात खास सन्मान केला. त्यांच्या मुंबई आणि स्थानिक पातळीवरील सामाजिक व शैक्षणिक कार्याचे मुख्यंत्र्यांनी कौतुक केले.साखळी गोवा येथे रवींद्र भवन येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी जनतेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र गावडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.प्राध्यापक डॉ. गावडे हे नवी मुंबई येथील भारतीय विद्यापीठातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी फिजिक्स विषयातून पीएचडी प्राप्त केली असून सदर विषयावर भाग १ व २ पुस्तकेही लिहिली आहेत. ते आपल्या मूळ गाव चौकुळच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच धडपडत असतात. जमीन प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याला यश मिळून लवकरच मार्गी लागला आहे. गावात शैक्षिणक सुविधा निर्माण करण्यातही ते नेहमीच सक्रिय असतात. त्यांचा एकूणच सामाजिक, शैक्षिणक कार्याची दखल घेऊन बायकर ग्रुपच्या माध्यमातून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत ॲड. राजाराम गावडे, आंबोली सैनिक स्कूलचे निवृत्त प्राचार्य सुरेश गावडे उपस्थित होते.*फोटो ओळी *साखळी : प्रा. डॉ. राजेंद्र गावडे यांचा सन्मान करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत*


Spread the love

Related posts

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब हजर राहणार!

news

भारतात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे भारताला गंभीर धोका ! – अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

news

दुर्गवीर प्रतिष्ठान,मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला तीन लॅपटॉप प्रदान.

news

Leave a Comment