स्टोरी

खोटले येथील स्वामी माऊलींच्या पालखीने अक्कलकोट नगरी निनादली..! स्वामी नामाचा गजर आणि ढोल-ताशांचा थरार

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले येथील पादुका पालखी अक्कलकोट परिक्रमा स्वामी भक्तांच्या अपूर्व उत्साहात संपन्न झाली.सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई येथून आलेले सुमारे दीडशे हून अधिक स्वामी भक्त या परिक्रमे मध्ये सहभागी झाले होते. अतिशय भक्तिमय वातावरणात ढोल, ताशा, टाळ, मृदूंग,यासह स्वामी नामाच्या गजरामध्ये पुण्यक्षेत्र अक्कलकोट निनादून गेले.देवगड मुटाट येथील श्री रामेश्वर ढोलपथक यांचे ढोलनृत्य अक्कलकोट येथे उपस्थित असलेल्या स्वामी भक्तांना आकर्षण ठरले.तुतारी वादक श्री.भालचंद्र चव्हाण यांचा तुतारी नाद अक्कलकोट मध्ये लक्षवेधी ठरला.स्वामी आगमन स्थान श्री खंडोबा मंदिर येथे श्री गणेश पूजन खोटले येथील पालखीचे पूजन श्री. निलेश परब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. खंडोबा मंदिर चे पुजारी यांनी पालखी मधील भाविकांचे स्वागत केले.आणि इथूनच परिक्रमा शुभारंभ झाला.वटवृक्ष देवस्थान, गुरुमंदिर, समाधी मंदिर या साडेतीन किमी मार्गांवर पालखी परिक्रमासंपन्न झाली.वटवृक्ष देवस्थान येथे श्रद्धास्थान खोटले येथील स्वामी भक्तांनी भजन सेवा सादर केली. या मध्ये बुवा श्री प्रसाद कसालकर, बुवा अशोक घाडीगावकर, बुवा सदानंद कसालकर यांनी भजने गायली.वटवृक्ष देवस्थान यांनी या पालखी परिक्रमा करिता गेलेल्या स्वामी भक्त यांना दर्शन व भजन या करिता सहकार्य केले.

खोटले येथील पालखीचे भव्य स्वागत वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले. मठाधीपती श्री गणेश घाडीगावकर यांचा सन्मान वटवृक्ष देवस्थान समिती अध्यक्ष श्री.महेश इंगळे यांनी केला.पालखी परिक्रमा मध्ये सहभाग घेतलेल्या स्वामी भक्तांची निवास व्यवस्था गाणगापूर रोड येथील भक्त निवास मध्ये करण्यात आली होती. खोटले श्रद्धास्थान पालखी मधील स्वामी भक्तांना विशेष महाप्रसाद व्यवस्था अन्नछत्र मंडळ यांनी केली होती.समाधी मठ येथे, खोटले येथून आलेल्या स्वामी पादुकांचे स्वागत करण्यात आले. तसेच या पादुका वर अभिषेक व महापूजा समाधी मंदिर येथे करण्यात आली.

हि पूजा झाल्यावर श्रद्धास्थान खोटले यांच्या वतीने महाप्रसाद याचे आयोजन केले होते.समाधी मंदिर येथे मुंबई निवासी श्री. निलेश परब यांनी खोटले श्रद्धास्थान भाविकसमोर ” आरोग्य विषयक मदत संकल्प जाहीर केला. ज्या मध्ये स्वामी भक्तांना आरोग्य विषयक सल्ला, रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची मदत, शासकीय मदत मिळवून देणे, इत्यादी सेवा श्रद्धास्थान च्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात येईल असे निलेश परब यांनी जाहीर केले.तीन दिवसाची अक्कलकोट परिक्रमा अतिशय भक्ती मय वातावरणात संपन्न झाली.या अक्कलकोट परिक्रमचे एक वैशिट्य म्हणजे परिक्रमा मार्गांवर पिण्याचे पाणी वाटप, तसेच ओआर एसचे पाणी व प्रसाद पालखी दर्शन घेणाऱ्या स्वामी भक्तांना श्रधास्थानच्या वतीने देण्यात येत होते.या अक्कलकोट परिक्रमा चे आयोजन श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, खोटले च्या उत्सव समितीने मठाधीपती श्री गणेश घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाने केले होते. या परिक्रमा करिता महंत श्री. श्री. १०८ गावडे काका महाराज यांनी शुभेच्छा दिल्याचे घाडीगावकर यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करा! सामाजिक बांधिलकीची मागणी

news

ओटवणे गावचा सुपुत्र सर्जनशील युवा कलाकार रोहित सुरेश वरेकर यांने कला क्षेत्रात घेतली मोठी झेप.

news

गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

news

Leave a Comment