सावंतवाडी: हॉस्पिटलमध्ये काय चालतंय, रुग्णांना कशा पद्धतीने सेवा दिली जाते, रुग्णांना विनाकारण खाजगी रुग्णालयामध्ये रेफर करण्यामागे काय हेतू आहे, रुग्णालयात रुग्णांना कशा पद्धतीने सेवा दिली जाते, रुग्णांसाठी सेवा बजावताना रुग्णांवर कोण दुर्लक्ष करतात किंवा कशा पद्धतीने वागणूक देतात या सर्व प्रकारांचा डाटा त्या सामाजिक कार्यकर्त्यां जवळ होता म्हणूनच त्या प्रामाणिक व निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचवून आज त्यांना गरजू व गोरगरीब रुग्णांच्या सेवेपासून दूर करण्यात आले. याला जबाबदार कोण? गेली सहा वर्ष ज्या रुग्णांना या सामाजिक कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे सेवा दिली ते रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक या सिस्टीमला जाब विचारतील का? कोरोना काळापासून गेली सहा वर्ष सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच सामाजिक जाण असलेले राजकीय व्यक्ती तसेच पत्रकार बांधव यांचे सावंतवाडी हॉस्पिटलसाठी फार मोठे योगदान आहे. याची रुग्णांना व येथील जनतेला जाणीव आहे. रुग्णांच्या काही समस्या असतील व त्यावर सिस्टीमचा दुर्लक्ष होत असेल तर अशा गोष्टी प्रकाशात आणण्याचे काम जेव्हा येथील सामाजिक कार्यकर्ते करतात तेव्हा येथील काही सिस्टर व काही डॉक्टरांना या गोष्टी खटकतात. त्यांच्या कामात त्यांना तो अडथळा वाटतो. जर एखादा रुग्ण वेदनेने तळमळत असेल किंवा एखाद्या रुग्णाला डॉक्टर किंवा सिस्टर यांची मदत हवी असेल अशावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यावेळी डॉक्टर किंवा सिस्टर यांच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यांना कमालीचा राग येतो. असं रवी जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.
सामाजिक बांधिलकीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव पुढे म्हणाले कि, पण ते तोंडावर बोलून दाखवत नाहीत पण मागून चर्चा करतात याची माहिती मिळत असते. काही दिवसांपूर्वी असाच एक विषय झाला एका प्रामाणिक व प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्याने एका सिस्टरला घाई गडबडीत चुकून आडनावाने हाक मारली की जरा पेशंटला सलाईन लावता का? खूप वेळ झाला असं नुसतं म्हटलं असता ती सिस्टरने त्या सामाजिक कार्यकर्त्याला रागाने म्हणाली मला एकेरी नावाने हाक मारायची नाही मी तुमची वर पर्यंत तक्रार करेन आणि त्या सिस्टरने त्या प्रामाणिक माणसावर आरोप केला की, “तुझी बदली करणार तुला कामावरून काढून टाकणार असा खोटा आरोप करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षकांकडे डॉक्टर व सिस्टर यांच्या 36 जणांच्या सह्या असलेल निवेदन दिल. त्या संदर्भाचे पत्र 11/5/26 ला रुग्ण कल्याण नियामक समितीच्या सदस्याला व्हाट्सअप द्वारे पाठवण्यात आल व त्याची सुनावणी 15/5/26 तारीखला ठेवण्यात आली परंतु सुनावणीच्या वेळी मात्र तक्रारदार घाबरून आली नाही असं जिल्हा रुग्णालयातील सिस्टर युनियन लीडर यांच्याकडून सांगण्यात आलं. याप्रसंगी सामाजिक संस्था व संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मात्र युनियन लीडरने आपली युनियन पावर दाखवून कोणाचाही काहीचं ऐकून न घेता जिल्हा रुग्णालयातील व उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित सिस्टर यांच्या एका मताने हॉस्पिटलमध्ये निस्वार्थपणे सेवा देणारे व हॉस्पिटल साठी आजपर्यंत दोन लाखाच्या वर रुग्णांसाठी रुग्णपयोगी साहित्य देणारे संस्थेचे कार्यकर्ते व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य यांचा तीव्र शब्दात अपमान करून आम्ही जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलचे काम बंद आंदोलन करू अशी धमकी दिली. पण खरंच काम बंद ठेवण्याएवढ काहीच झालं होतं का? तर नाही मग सामाजिक कार्यकर्त्यांवर एवढा रोष का? ज्या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांवर जो विनाकारण आरोप केला गेला यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. युनियन लीडर सरळ सरळ धमकी देतात की यापुढे आमच्या हॉस्पिटलमध्ये सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती तसेच पत्रकार यांनी विनाकारण यायचं नाही तसेच येथील रुग्णांना तुमच्या मदतीची काही आवश्यकता नाही आम्ही समर्थ आहोत आणि लक्षात ठेवा. आमच्या सिस्टर शी एकही शब्द बोलायचं नाही तुमच्यासारख्या माणसांनी आम्हाला काही संबंध ठेवायचे नाही अशी त्या युनियन लीडरने अपमानास्पद वार्ता केली पुढे त्या म्हणाल्या तुम्ही सतत हॉस्पिटलमध्ये येत असल्यामुळे आमच्या स्टाफवर तुम्हा लोकांचा दबाव राहतो तुम्ही लोक हॉस्पिटलवर सारखा लक्ष ठेवून असतात त्यामुळे आमच्या सिस्टर व डॉक्टर यांच्याकडून काम करताना चुका होतात असाही गंभीर आरोप देखील केला. वर म्हणाल्या तुमच्या बायका घरी आराम करत असतात त्यावेळी आमचा लेडीज स्टाफ येथे दिवस रात्र रुग्णांची सेवा करत असतात. हे ऐकून उपस्थित प्रतिष्ठित त्यांचं ते प्रखड पणे बोलणं उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनाला लागलं सदर चुकीचं बोलणं अपमानास्पद वाटल्यामुळे सदर सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या अशा बोलण्याचा तीव्र विरोध केला असता युनियन लीडर व त्यांच्या सहकारी सिस्टर रागा रागाने उठल्या व म्हणाल्या आज पासून आम्ही काम बंद करतो तुम्हीच आता सांभाळा हे हॉस्पिटल असं सांगून सर्व सिस्टर व डॉक्टर रागारागाने बाहेर पडल्या व म्हणाल्या जोपर्यंत तुम्ही आमची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार. सदर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सदर उपस्थित प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णांचे हाल होतील या विचाराने थोडं नमत घेऊन त्यांची माफी मागितली व त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या. उद्या पुन्हा विनाकारण अशीच बदनामी सामाजिक कार्यकर्त्यांची या सिस्टीम कडून केली जाईल या कारणास्तव गेल्या सहा वर्षापासून दिवस-रात्र अखंडित सेवा देणारे सच्चे सामाजिक कार्यकर्ते मागील २० दिवसापासून हॉस्पिटल कडे पुन्हा परतलेच नाही याला जबाबदार सिस्टर स्टाफ व डॉक्टरच आहेत कारण त्या खोट्या निवेदनावर या सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे असे सांगणारे सिस्टर व डॉक्टर यांच्या सह्या आहेत. मग विचार करा या मनमानी चाललेल्या कारभारामुळे गरजू व गोरगरीब रुग्णांना अडचणीच्या वेळी कोण मदत करेल हा एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
