स्टोरी

सुकळवाड येथे सोलर युनिटचे उदघाट्न!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत सुकळवाड व प्रेरणा फाउंडेशन येडेनिपाणी ता. वाळवा,जिल्हा सांगली या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय सुकळवाड येथे व जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकळवाड येथे सोलार युनिट बसविण्यात आले. यावेळी सदर उद्घाटन कार्यक्रमास प्रभारी सरपंच श्री.किशोर पेडणेकर,ग्रामपंचायत सदस्य सौ. जानकी पावसकर,सौ.वृषाली गरुड, माजी पंचायत समिती सभापती श्री.अजिंक्य पाताडे, माजी पंचायत समिती उपसभापती श्री.प्रसाद मोरजकर, श्री. सागर कुशे समिती सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील पाताडे,मुख्याध्यापक श्री नांदोसकर सर, समिती सदस्य श्री.हेमंतकुमार पाताडे, श्री. प्रदीप पाताडे, श्री. पंढरी पाताडे, श्री. किरण पाताडे, ग्रामस्थ सौ. धामापूरकर,श्री. भूषण पाताडे,अंगणवाडी सेविका श्रीम. संजना कुशे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री.अक्षय पाताडे, केंद्रचालक रूपाली बिलये ग्रामपंचायत सफाई कर्मचारी श्री.सुभाष म्हसकर व ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वेदिका गोसावी या उपस्थित होत्या.सौर ऊर्जेचा वापर करून जास्तीत जास्त विद्युत ऊर्जेची बचत करण्यासाठी तसेच येणारा विद्युत बिलाचा खर्च कमी करण्यासाठी सोलार युनिटचा उपयोग होणार आहे. नजीकच्या भविष्यकाळातील इंधनाची टंचाई लक्षात घेता पर्यावरण संरक्षणासाठी सौर ऊर्जा हा एक उत्तम पर्याय ठरणार असल्याचे मनोगत उपस्थितानी व्यक्त केले.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज “अबोली ऑटो रिक्षा” या महत्त्वकांशी योजनेचा शुभारंभ !

news

हनुमान कोळीवाडा गावातील महिला करणार जेएनपीटी चैनल बंद आंदोलन ….

news

सावधान! ‘एनर्जी ड्रिंक्स’ च्या नावाखाली नशा आणणारी शीतपेये बाजारपेठेत उपलब्ध….

news

Leave a Comment