Uncategorized

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला हवालदार मनिषा पुकाळे हिचे पुणे बुधवार पेठेशी थेट संबंध.

Spread the love

पुणे: पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात एका धक्कादायक प्रकार घडला आहे. एक बांगलादेशी तरुणी स्वतः मदतीसाठी पोलीस ठाण्यात आली असता तिला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांच्यावर झाला आहे. या प्रकरणी संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांना आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसंच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली. हा सगळा प्रकार घडत असताना त्या महिला पोलीस मनिषा पुकाळे यांनी मदत करण्याऐवजी त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेले. तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती, त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आलं. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचं सत्य समोर आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडालीआहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे हिने कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचं निष्पन्न झालंआहे.तसेच एक महिला असून महिलेला समजून न घेता केलेलं कृत्य हे अति क्रूर आणि घाणेरडं आहे. या घटनेनंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले. या सगळ्या प्रकरणी आता राज्य महिला आयोगाने लक्ष घातलं असून ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने हा सगळा धक्कादायक आणि घाणेरडा प्रकार केला आहे, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा असे आदेश स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याची सविस्तर चौकशी करून


Spread the love

Related posts

संतोष बांगर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार?

news

सावंतवाडी शहराला आता स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार….

news

देशातील कारागृहांमधील ७७ टक्के बंदीवानांवरील खटले प्रलंबित!

news

Leave a Comment