स्टोरी

भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा मसुरेत भव्य नागरी सत्कार..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाचा कल्याण जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पक्षाने मला दिलेली नवी जबाबदारी हे आव्हानत्मक काम आहे. पाच आमदार या कार्यक्षेत्रात येतात. ग्रामदैवत श्री देव भरतेश्वराचे आशीर्वाद आणि सर्व ग्रामस्थ यांच्या शुभेच्छा यामुळे हे शिवधनुष्य मी निश्चित पेलणार आहे. अध्यक्षपदी निवड करून पक्षाने माझ्या प्रामाणिक कामाची पोचपावती दिली असल्याचे मी मानतो. ज्या ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या त्या ठिकाणी तुमच्या सुख दुःखात मी नेहमी सोबत असेन. जिथे जिथे मी चुकेन तिथे तुम्ही हक्काने मला माझी चूक सांगा. आतापर्यंत माझे अनेक सत्कार झाले परंतु आजच्या घरच्या नागरी सत्काराने आणखी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल यासाठी मी सदैव मसुरे ग्रामस्थांचा ऋणी राहीन असे प्रतिपादन मसूरे गावचे सुपुत्र व भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर उर्फ नंदू परब यांनी येथे केले.

घरच्या सत्काराने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल..! नंदू परब

भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी मसूरे गावचे सुपुत्र नंदू परब यांची निवड झाल्याने तमाम मसूरे ग्रामस्थांच्या वतीने येथील बागवे हायस्कुल सभागृहात सन्मानपत्र देत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, माजी प स सदस्य महेश बागवे, माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर, माजी उपसरपंच राजेश गावकर, मालोड माजी उपसरपंच जितेंद्र परब, मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, बाबू आंगणे, विलास मेस्त्री, यासिन सय्यद, जगदीश चव्हाण, पंडित नाचणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब म्हणाल्या, अत्यंत नम्र स्वभावाच्या नंदू परब यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या कठोर परिश्रमातून या पदापर्यंत ते पोहोचले आहेत. नंदू परब यांच्या कार्यकाळात भाजपची कल्याण जिल्ह्यातील वाटचाल अधिक दैदीप्यमान होईल अशा शब्दात शुभेच्छा देताना त्यांना पुढील काळात आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी म्हणाले, पक्ष निष्ठा म्हणजे नंदू परब. सध्याच्या सर्व जिल्हाध्यक्ष मध्ये नंदू परब हे सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष बनले आहेत. आपल्या गावचा एक सुपुत्र भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचा कल्याण जिल्ह्याचा अध्यक्ष होतो ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. भाजप सदस्य अभियानात फार मोठे योगदान नंदू परब यांचे लाभले आहे. माजी प स सदस्य महेश बागवे म्हणाले, नंदू परब यांचे पक्षासाठी मोठे योगदान असल्यानेच या जबाबदारीच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. आगामी काळात ते आमदार होऊन मंत्रिपदाचा लाल दिवा गावाला मिळावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी यशवंत हिंदळेकर, दिलीप परब, प्रमोद बागवे, हिरबा तोंडवळकर, लक्ष्मण शिंगरे, अवधूत चव्हाण, समीर लब्दे, अनिल मेस्त्री, भानुदास परब, मनीष बागवे, सचिन कातवणकर, आशिष खोत, संतोष मसुरकर, संतोष सावंत, बापू मसुरेकर, पोलीस पाटील साई बागवे, अभि दुखंडे,संजय माने आदी उपस्थितीत होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार विठ्ठल लाकम यांनी केले.


Spread the love

Related posts

कातवड येथे आगीत जळालेल्या रवींद्र परब यांच्या घराची आ. वैभव नाईक यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत

news

रत्नागिरी नगर परिषदेचा पहिला क्रमांक : १ कोटी ५० लाख रुपयांचे मिळाले पारितोषिक! शासनाचे माझी वसुंधरा अभियान!

news

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन!

news

Leave a Comment