स्टोरी

कुंब्रल ते रूमडची गोठण रस्त्याच्या बोगस कामामुळे रस्त्यावर भला मोठा खड्डा…! ग्रामस्थ आक्रमक.

Spread the love

दोडामार्ग प्रतिनिधी:  डजी गोठण रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यात आले खरे पण सदरचे डांबरीकरण खडीकरण निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच सदर मार्गावर खडीकरण डांबरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्यालगत असलेल्या साईड पट्टी अथवा कुठलीही डागडूजी संबंधित ठेकेदाराने केलीच नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना वाहने चालवताना रस्त्याच्या बाजूने असलेल्या एका मार्गावर कुठलेही डांबरीकरण खडीकरण न केल्याने सदर मार्गावर खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यात वाहने पडून अपघात घडलेली आहेत. असे असताना गावचे सरपंच व संबंधित विभागाच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकारी कल्याणकर यांच्या कानी ही बाब घालण्यात आली. पण त्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. सदर ठेकेदाराला पाठीशी घालण्यामागे सरपंच ग्रामसेवकांचा नेमका कोणता हेतू आहे. यामागे काही काळेभोळे लपले आहे का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. सदरचा मार्गावर झालेला खड्डा जर न बुजवल्यास येत्या आठ दिवसात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्या विरोधात तसेच सरपंच ग्रामसेवक यांच्या एकंदरीत मनमानी कारभारावरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

या मार्गाचे काम जिल्हा नियोजन मधून खडीकरण डांबरीकरण साठी मंजूर झाले.सदर रस्त्याचे डांबरीकरण खडीकरण करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी श्री कल्याणकर हे देखभाली साठी आले होते. मात्र यावेळी डजी गोठण भागातील ग्रामस्थांनी सदर रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करताना बाजूने जाणाऱ्या मार्गावर उताराला थोडे खडीकरण डांबरीकरण करावे कारण या रस्त्यावर कुठलीही साईड पट्टी नाही आहे. तसेच गटार खुदाई केलेली नाही आहे. त्यामुळे या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने खडीकरण डाबरीकरण करावे. अशी मागणी करण्यात आली होती. असे असताना सदर ठेकेदार व श्री अधिकारी कल्याणकर यांनी या बाबीकडे गांभीर्याने न पाहता ग्रामस्थांना फक्त आश्वासनाचा गाजर दाखवण्याचे काम केले. या गावचे सरपंच श्री जनार्दन गोरे यांच्या कानी सदरची बाब ग्रामस्थ यांनी घातली. मात्र श्री गोरे यांनी सदर ठेकेदाराला कुठलीही कल्पना न देता तुम्ही आम्हाला अर्ज द्या असे सांगितले. यानुसार ग्रामस्थांनी अर्जही दिले. पण त्या अर्जाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे या पावसाळी कालावधीत या मार्गावरील रस्ता पूर्णपणे या खडीकरण डांबरीकरणामुळे खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यात चार चाकी दुचाकी वाहने ये जा करताना अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. तर या खड्ड्यामुळे अपघात होऊन काही झाल्यास किंवा वाहनांची नुकसान झाल्यास संबंधित ठेकेदार व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधा त दाद मागण्यात येईल व सदर व्यक्तीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वीच धातुर मातुर करून हा ४०० मीटरचा रस्ता जिल्हा परिषद नियोजन मधून मंजूर झालेला सदर ठेकेदाराने केला खरा परंतु या मार्गात फक्त खडीकरण करून मलमपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास लाखो रुपये ची उधळपट्टी झाली आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे. असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या रस्त्याच्या बाजूला कुठलीही साईड पट्टी केलेली नाही. तसेच रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यापूर्वी हा रस्ता खरंतर सुरळीत होता. मात्र खडीकरण डांबरीकरण केल्यामुळे या पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या वाड्यातील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहे. जर ठेकेदाराने वेळीच हा खड्डा न बुजवल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल. ग्रामसेवक यांच्याकडेही याबाबत ग्रामस्थांनी विचारणाही केली. मात्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी टोलवा टोलवी चे उत्तरे ग्रामस्थांना दिली आहेत याबाबतही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. या भागाचे सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे युवा नेते सुहास पालव, गोपाळ शेटय यांनी यासंदर्भात वारंवार ग्रामपंचायत कडे तसेच संबंधित ठेकेदार व जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी यांना कल्पनाही दिली आहे. तर त्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील ग्रामपंचायत सदस्य संजय धुरी यांनीही या रस्त्याच्या झालेल्या खड्ड्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यावर झालेल्या खड्डा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणार आहे. त्यामुळे तात्काळ मुख्य रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजवण्यात यावा हा रस्ता देवस्थान कडे जाणार आहे. त्यामुळे तात्काळ संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी याबाबतची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

मालवणमध्ये नौसेना दिनाच्या निमित्ताने होणार्‍या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार! खासदार विनायक राऊत

news

मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर प्रथम कलशारोहण वर्धापनदिन १३ मे रोजी….

news

व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा.

news

Leave a Comment