स्टोरी

बांदिवडे येथील रक्तदान शिबिरात २६ दात्यानी केले रक्तदान !

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने बांदिवडे शाळा नंबर २ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २६ दात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. शिवजयंती उत्सवा निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन बांदिवडे पालेवाडी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन करून झाला. यावेळी सरपंच आशु मयेकर, ग्रामस्थ संघांचे अध्यक्ष आनंद परब, वैद्यकीय अधिकारी पल्लवी सुरवसे,प्रांजली परब, रक्तपेढी तंत्रज्ञ विशाल जाधव, नेहा परब, तंटामुक्ती अध्यक्ष शाहूलखन बांदिवडेकर, बांदिवडे उपकेंद्राच्या सायली गोंधळेकर, दीप्ती पोवळे, यादव,शामला आईर,पोलीस पाटील संदेश पवार, प्रियंका सावंत, ग्रामस्थ संघाचे उपाध्यक्ष विलास परब, सचिव उदय सावंत, सहसचिव प्रशांत परब, खजिनदार अजय घाडीगावकर, प्रफुल्ल प्रभू, उमेश परब, शंकर आईर, रामचंद्र माळकर, सतीश आईर, संदीप घाडीगावकर, प्रकाश घाडीगावकर, प्रमोद परब, मंगेश राणे, गोविंद घागरे,सुनील घाडीगावकर, ऋषिकेश जाधव, प्रसाद वरक,जाधव सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी मिलिंद चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व रक्तदात्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने प्रदान करण्यात आली. आभार अध्यक्ष आनंद परब यांनी मानले.


Spread the love

Related posts

पोलीस निरीक्षक सचिन गवस राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

newss

राणे साहेबांच्या विचारातून जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभार…! माजी खासदार डॉ निलेश राणे

news

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

news

Leave a Comment