स्टोरी

सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने महिला कामगार करीता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.

Spread the love

कुडाळ प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या १ जानेवारी २०२५ पासून सुरु करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयास अनुसरुन, मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व मा.श्री कृषीकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल सिंधुदुर्ग मार्फतीने अमृता कॅश्यु इंडस्ट्रीज एम. आय. डी. सी. कुडाळ येथील महिला कामगार करीता जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

उपस्थित महिला कामगार
उपस्थित महिला कामगार

सदर कार्यक्रमामध्ये फॅक्टरी मॅनेजर श्री मिलींद गावडे आयोजक श्री आग्नेल फर्नाडीस कोऑडीनेटर असोसीएशन एमआयडीसी कुडाळ यांचे उपस्थितीमध्ये सपोनि श्रीमती हिरेमठ, श्रीमती मिनाक्षी नाईक, सखी वन स्टॉप सेंटर, श्री. वाघाटे, कुडाळ पोलीस ठाणे सोबत पोहेकॉ ७०३ पाटील तसेच मपोहेकॉ १५१ खोपकर, मपोहेकॉ ९७७ सावंत यांनी उपस्थित महिलाना नविन कायदा, पोलीस हेल्पलाईन नं डायल ११२, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार बाबत मार्गदर्शन केले तसेच महिला कामगार यांना बडीकॉप या पोलीस कम्युनिटी मार्फत चालणाऱ्या विशेष मोहिमेची माहिती पुरविण्यात आली. सदर कार्यक्रमास ६०-६५ महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 


Spread the love

Related posts

मडुरा रेल्वे स्थानकाला “हॉल्ट स्टेशन”चा दर्जासाठी माजी सरपंच सुरेश गावडे यांचं बेमुदत उपोषण.

news

कोमसाप सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी च्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा.

प्रसाद परब

ब्रेकिंग न्यूज: ‘रामलल्ला’च्या जयघोषात सहभागी व्हा, आणि श्रीरामाचा “गोल्ड कॉईन” जिंका…!

news

Leave a Comment