स्टोरी

सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त मळा ते गोटेवाडी रस्त्याच्या जीवघेण्या रस्त्यामुळे गावकरी आक्रमक.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त मळा ते गणशेळवाडी- शिरशिंगे- गोटेवाडी असा सुमारे सात किमी अंतराचा रस्ता अडीच कोटी रुपये विशेष योजनातून मंजूर झाले आहेत. यापैकी जवळपास दोन किमी अंतराचा रस्ता गेल्या मे महिन्यात डांबरीकरण खडीकरण करून अर्धवट स्थिती ठेवण्यात आला आहे. सदरचा हा अर्धवट स्थित असलेल्या रस्त्यावर कार्पेट व गटार आधी सर्व कामे येत्या १५ जानेवारी पासून ते १५ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत हा संपूर्ण रस्ता पूर्ण करण्याची हमी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सजगरे व ठेकेदार अमेय आरोंदेकर यांनी कलंबिस्त गावातील तरुण मंडळांच्या शिष्टमंडळाला दिले.

सदर रस्ता गेल्या पाच सहा महिन्यापासून खडबडी स्थितीत आहे संपूर्ण पावसाळा या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन काढण्यात आला. वारंवार बांधकाम विभागाला जाग आणूनही रस्ता अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या कायम उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आज नव्या वर्षाच्या प्रारंभीच एक जानेवारीला गावातील सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी श्री. सजगरे यांनी सदरचा रस्ता १५ जानेवारी पर्यंत काम हाती घेण्यात येईल. असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे, भाजपचे संदेश बिड्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय कदम, माजी सरपंच कृष्णा उर्फ बाळू सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत, बाबा पास्ते, विठ्ठल उर्फ गोठ्या सावंत, सचिन सावंत, कुसजी सावंत, प्रथमेश सावंत, चेतन सावंत, संतोष सावंत, नामदेव पास्ते, सखाराम उर्फ बाबू न्हानू सावंत, एडवोकेट संतोष सावंत, शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय पालकर, गौरव बिड्ये आधी शिष्टमंडळात उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत, विजय कदम, संदेश बीडये, बाळू सावंत, रवींद्र तावडे यांनी कलंबिस्त पंचक्रोशीतील लोकांची तुम्हाला किंमत नाही का? आम्ही वारंवार हा रस्ता वेळेत पूर्ण करा. अशा सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याच्या कामाकडे टोलवाटोल करत आहेत. हे योग्य नाही. येत्या महिन्याभराच्या पूर्वी हा रस्ता योग्य पद्धतीत काम न झाल्यास संपूर्ण गाव रस्ता रोखो आंदोलन छडेल. असा इशारा देण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री सजगरे यांनी सदर रस्त्याचे काम १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण केले जाईल. अशी ग्वाही दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विजय कदम, प्रमोद नवतारे, श्री राणे, सीमा गोवेकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

परमेश्वराने दिलेली सुंदर जबाबदारी म्हणजे दिव्यांग मूल…! सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन

news

मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने गरजू विध्यार्थ्यांना २ लाख २० हजार रुपयाचे उपयोगी साहित्य प्रदान.

news

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती शिवनेरी बसचा अपघात!

news

Leave a Comment