स्टोरी

कोलगाव चर्चाजवळ झालेल्या अपघातात २४ वर्षीय दिनेश सिंग गंभीर जखमी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: दिनेश सिंग वय २४ राहणार कोलगाव चर्चाजवळ थांबलेल्या फोर व्हीलर गाडीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे दिनेश सिंग वय २४ राहणार कोलगाव गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री १०:३० च्या दरम्यान घडली आहे. तेव्हा त्याचे मित्र मंडळी आशिष सुकी अमन मेमन, रोमित रेडीज, विपुल भिसे, तन्मय पांगम, यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल केले.

सदर अपघात ग्रस्त युवकाच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. ऑर्थोपेडिक अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निखिल अवधूत यांनी त्याच्यावर प्राथमिक विचार करून त्यांना गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले. तसेच राणी पार्वती हायस्कूल च्या मैदानात भटवाडी येथील गोविंदा पथकाचा थर कोसळून एकाला दुखापत झाली त्यालाही उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सदर युवकाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर औषध उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले . सदर अपघातग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

बिळवसच्या महिला देश पातळीवर चमकाव्यात! सरपंच मानसी पालव. बिळवस मध्ये कर्तुत्ववान महिलांचा सन्मान..

news

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

प्रसाद परब

स्वतःचा जेसीबी असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मालवण नगरपरिषद….!

news

Leave a Comment