स्टोरी

सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव निमित्त आयोजित रानभाज्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणातील वर्षा ऋतूतील रानभाज्या या कोकणी रेसिपी आहेत. ही रेसिपी सावंतवाडी च्या बाहेर वर्षाच्या बाराही महिने पोहोचायला हवी. त्यासाठी कोल्ड साठवण करणे गरजेचे आहे. तरच कोकणी रेसिपी चे वेगळेपण दिसेल. असे मत सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी स्पष्ट केले. सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या रान भाजी स्पर्धा व प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संजू परब, संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, कार्यप्रमुख एडवोकेट संतोष सावंत, सचिव प्रताप परब, माजी सचिव प्रल्हाद तावडे, उपाध्यक्ष विभावरी सुकी मोहिनी मडगावकर. खजिनदार हर्षवर्धन धारणकर, प्रमोद सावंत, शशिकांत मोरजकर, गजानन बांदेकर, सुहास सावंत,  नारायण राणे, शैलेश सरंबळकर, किशोर रावराणे, गोपाळ राऊळ, कृष्णा परब, गुरुनाथ सावंत, विक्रम परब, अजय गोंदावळे, विनोद सावंत, मांजरेकर, साटलकर आधी उपस्थित होते.परीक्षक हेमलता सावंत, संगीता दळवी, वैदही गावडे, संगीता पाटकर, मंगल देसाई आधी उपस्थित होते.

यावेळी माझे नगराध्यक्ष संजू परब म्हणाले सह्याद्री फाउंडेशनने कोकणी रानभाजा टिकाव्यात आणि पुढील पिढीला त्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी सह्याद्री फाउंडेशन, सावंतवाडी गेली पाच वर्ष अशी स्पर्धा घेत आहे. येत्या काळात ही स्पर्धा अधिक व्यापक केली जाईल. असे ते म्हणाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी मानसून महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. रानभाजी स्पर्धा घेऊन आरोग्याच्या दृष्टीने सर्वात ही महत्त्वाची अशी स्पर्धा आहे. रानभाज्या या आरोग्य दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ते टिकावे यासाठी अशा स्पर्धा आम्ही घेत आहोत.

यावेळी सूत्रसंचालन एडवोकेट संतोष सावंत, आभार उपाध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केले. यावेळी स्पर्धकांमधून सौ. मडगावकर यांनी आपले विचार मांडले यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Spread the love

Related posts

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधांमुळे ग्रामस्थ्य आक्रमक!

news

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा……श्रीकांत सावंत…

news

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व श्रीराम वाचन मंदिर आयोजित तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत अंकिता पाटील प्रथम…!

news

Leave a Comment