स्पोर्ट

सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर निर्गुण हिची वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर निर्गुण हिची दिनांक 6 एप्रिल 2024 ते 10 एप्रिल 2024 या कालावधीत ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या 51 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप 2023-24 या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सहा जणांच्या महिला संघात निवड झाली आहे.

2015 सालापासून वयाच्या दहाव्या वर्षांपासून कॅरम खेळत असताना आतापर्यंत 2 सब ज्युनियर, 3 ज्युनियर, 3 वरिष्ठ राष्ट्रीय,1 फेडरेशन कप कॅरम स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संपातून सहभागी झाली असून 2 वेळा सांघिक विजेतेपद,3 वेळा उपविजेतेपद, 2 वेळा तृतीय क्रमांक, 1 वेळा वैयक्तिक तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला कॅरम संघात सलग तिसऱ्या वेळी निवड होणारी सिंधुदुर्गातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे राज्यात घेण्यात आलेल्या वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सहभाग घेऊन एक विजेतेपद, चार उपविजेतेपद प्राप्त करून यश संपादन केले आहे.

सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशन व कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी कडून तिला ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Spread the love

Related posts

मालवण प्रभागस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव रेकोबा हायस्कुल वायरी मालवण येथे उत्साहात संपन्न.

news

कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब क्रीडा पटांगणावर सिद्धार्थ युवक क्रिडा मंडळ आयोजित – भव्य कब्बड्डी स्पर्धेला प्रारंभ

news

कोमसाप च्या वतीने प्राध्यापक मिलिंद भोसले आणि एडवोकेट दीपक नेवगी स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

news

Leave a Comment