स्टोरी

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानद्वारे सोनुर्ली येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सोनुर्ली प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, घसा, थायरॉईड, बालरोग, पचन, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात येणार आहे.

   सोनुर्ली परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

धवडकी ते सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे, शिवापूर या मुख्य राज्यमार्ग १९० या रस्त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते संपन्न.

प्रसाद परब

पळसंब जयंती देवी मंदिर येथे मोफत वृत्तपत्र वाचण्यास उपलब्ध…!

news

रामजन्मोत्सवानिमित्त १७ रोजी विश्व हिंदू परिषदेतर्फे सावंतवाडीत भव्य शोभायात्रा

news

Leave a Comment