Uncategorized

तर जीभ हसडून टाकू… एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!..

Spread the love

खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेत आहेत. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आम्हाला देशद्रोही म्हटला असता तर जीभ हसडून टाकू, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते खेड येथे जाहीर सभेत बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.


Spread the love

Related posts

रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका समृद्धी संजय पिळणकर – मूननकर यांचा ‘महाराष्ट्र शैक्षणिक सेवारत्न पुरस्काराने सन्मान…

news

आंबोली घाटात एसटी- कारमध्ये अपघात…

news

वेंगुर्ल्याचे सुपुत्र अद्वैत प्रकाश बोवलेकर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान 

news

Leave a Comment