स्टोरी

कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या हातातून साकारलेली नऊ बाय सहा फूट आकाराची श्री राम प्रभूंची रांगोळी…!

Spread the love

सावंतवाडी: येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे अयोध्या रामभूमी श्रीराम लल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून ही श्रीराम प्रभूंची रांगोळी साकारण्यात आली. प्रशालेचे कलाशिक्षक श्री केदार टेमकर यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक श्रीराम यांची रांगोळी साकारली व विद्यार्थ्यांना रांगोळी या कलेबद्दलची प्रत्यक्ष माहिती दिली. रांगोळीची साईज सहा बाय नऊ फूट असून अवघ्या चार तासांमध्ये ही रांगोळी साकारण्यात आली.रांगोळी सजविण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांचा सडा घालून, पणत्या लावण्यात आल्या आणि रामरक्षा म्हणण्यात आली. हे सर्व साकारत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण भक्तिमय आनंद दिसत होता . तसेच रांगोळी पुर्णत्वास साकारत असताना रामभक्तिस स्पर्शाचा विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनीही उपस्थित राहून याची देही याची डोळा आनंद घेतला.

प्रशालेचे कलाशिक्षक टेमकर सर यांच्या या कलाकृतीचे भरभरून कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई व सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन.पी. मानकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक यांचे कडून कौतुक करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

ठाणे येथील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणचे अतिक्रमण न हटवल्यास तेथे शंकराचे मंदिर उभारू! लँड जिहादच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची चेतावणी

news

वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे! रामदास आठवले

news

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड वरील प्रसाधनगृहाची दुरावस्था..! प्रवासी व नागरिकांमध्ये नाराजी.

news

Leave a Comment