स्टोरी

अक्कलकोटच्या पुरातन श्रीराम मंदिरातही २२ रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…! अध्यक्ष महेश इंगळे

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: अयोध्यातील ऐतिहासिक नुतन श्रीराम मंदिर निर्मितीनंतर येत्या सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी विक्रम संवत २०८०, शालिवाहन शके १९४५, मिती पौष शुक्ल द्वादशी रोजी अभिजीत मुहूर्तावर, मृगाशीरा नक्षत्रात दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना होवून अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा संपूर्ण देशवासियांनी धर्मोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन केंद्र शासन व राम मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या मंगल क्षणाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरातील ४ लाखांपेक्षा अधिक विविध देवी देवतांच्या मंदिरांमध्येही २२ जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यानिमित्ताने येथील अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोडवरील पुरातन श्रीराम मंदीरातही मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक, रामनाम जप, सत्संग महिला भजनी मंडळाची भजन सेवा, किर्तन, प्रसाद वाटप, दीपोत्सव इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन संपूर्ण देशात साजरा होणाऱ्या या धर्मोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

उठ भगिनी जागी हो, चंडी दुर्गा गार्गी हो । भगीनींनो स्वतःमधील क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा !

news

श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…!

news

रेडीरेकनर’ च्या दराबाबत समाधान, बांधकाम संघटनांकडून स्वागत…!

प्रसाद परब

Leave a Comment