स्टोरी

अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे तरुणीचा अपघाती मृत्यू…!

Spread the love

३१ डिसेंबर वार्ता: “सध्या विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण पर्यटनासाठी नियोजन करत आहे. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी रविवारी सकाळी मुंबई येथील तरुणींचा समूह पर्यटनासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे आले होते. आपल्या मैत्रिणींसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणीचा सांधण व्हॅली बघत असताना पाय घसरून ती खाली पडली आणि डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मृत्यू झालेल्या तरुणीची आपल्या मैत्रिणींसोबतची शेवटची भेट ठरली”

 

“याबाबत अधिक माहिती अशी की, आज रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील साम्रदजवळील सांधण दरी जवळ ऐश्वर्या खानविलकर नामक तरुणी आली आणि ती खाली डोकावून पाहत असताना तिचा पाय घसरून ती दरीत पडल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून खाली खडकावर तिचं डोकं आपटले गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी मुंबईतील अनेक पर्यटक येत असून तरुणींचा समूह देखील सकाळीच दाखल झाला होता. भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर ते सर्वजण सांधण दरीत गेले (निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’).” त्यातील ऐश्वर्या खानविलकर (वय 24 वर्षे, रा. दहिसर, मुंबई) या तरुणीचा एका खडकावरुन पाय घसरला. त्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली. दुर्दैवाने एका खडकावर तिचे डोके आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत राजुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच, सदरील मृतदेहाला ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले आहे. याबाबत पुढील तपास राजुर पोलिस करीत आहे”


Spread the love

Related posts

मुंबई-पुणे द्रुतगती एक्सप्रेस हायवे ठरतोय मृत्यूचा सापळाच

news

मसुरेतील भरतगड येथे २० जून रोजी ‘रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थेचा’ स्थापना सोहळा.  

news

मॉरिशसमध्ये स्थायिक व मूळ भारतीय मराठी प्रेमी बांधव यांचे सिंधुर्गात जिल्ह्यात होणार आगमन.

news

Leave a Comment