क्राईम

लैंगिक अत्याचार प्रकरणी नांदगावातील तरुण ताब्यात

Spread the love

पुणे-निगडी पोलिसांची कारवाई.

कणकवली: लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे – निगडी पोलिस ठाण्यात सिंधुदुर्गातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल असलेला संशयित कमलेश सुरेश मोर्ये (३९, रा. नांदगाव तिठा) याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले. हि कारवाई निगडी पोलिस व कणकवली पोलिसांनी शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास केली. कमलेश मोर्ये याला राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तर निगडी पोलीस त्याला पुणे – निगडी येथे घेऊन गेले.

 

या कारवाईमध्ये निगडी पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी नागरगोजे, शिपाई दीपक जाधव तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे शिपाई उद्देश कदम आणि होमगार्ड सहभागी झाले होते.


Spread the love

Related posts

रत्नागिरीत रोखपालनेच केली बँकेची फसवणूक: दीड लाख रुपये चोरले

news

मुंबई पोलिसांकडून एका आलिशान हॉटेलवर छापा! एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

news

बिहार राज्‍यातून आलेल्‍या ६३ अल्‍पवयीन मुसलमान मुलांना आजरा येथे नेतांना पकडले!

news

Leave a Comment