स्टोरी

कर्नाटक येथील मतिमंद निराधार “प्रशांत” ला सामाजिक बांधिलकीचा आधार….

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरामध्ये गेले कित्येक दिवस भटकत असलेला कर्नाटक येथील प्रशांत नामक (वय वर्ष ३७)  युवक थोडासा मतिमंद असल्यामुळे शहरातील जनतेला त्रासदायक ठरला होता. त्याच्या उजव्या पायाला मोठी जखम झाली असून पायाला होल पडून गॅंग्रीन झालेले आहे. त्यामुळे त्याला खूप वेदना होत आहेत. सकाळपासून तो तलावाच्या काठी उन्हातच पडून होता. हे पाहून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी त्याची दखल घेतली. त्यावेळी त्याला असंख्य वेदना होत होत्या. कपडे घाण झाले होते व अंगातून दुर्गंधी वाहत होती. त्यामुळे सर्वप्रथम त्याची केस दाढी करून त्याला स्वच्छ आंघोळ घालून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

सावंतवाडी शहरातील सलून चालवणारे यूपी येथील युवक शैलेश ठाकूर यांनी सामाजिक भान राखून त्याची केस दाढी केली. तसेच होमगार्ड राजन सांगेलकर व पोलीस पी. आय. अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकीला मोलाचे सहकार्य केले. उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून आता त्याला 108 ने अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. सदर बेवारस पेशंट बरा झाल्यानंतर योग्यरीता प्रोसिजर करून त्याला संविता आश्रम मध्ये पाठवण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी घेईल. ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्याचे काम सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व राजू मसुरकर यांनी पाहिले. याप्रसंगी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

।।जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम ।। १६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव!’

news

न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट मार्फत जिव्हाळा सेवाश्रमला इन्वर्टर व जीवनावश्यक वस्तूची भेट.

news

राज्याच्या कारागृहात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने ड्रोन, व्हिडीओ कॅमेऱ्यांनी नजर असणार

news

Leave a Comment