स्टोरी

इस्राइलन सैन्य मुख्य गाझा शहरात पोहोचलं!

Spread the love

देश विदेश: ७ ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्राइलवर मोठा हल्ला केल्यानंतर हमासला प्रत्युत्तर देत इस्राइलने काही तासांमध्येच युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर इस्राइलने गाझा पट्ट्यामध्ये हवाई हल्ले केलेआणि आता आपलं सैन्य मुख्य गाझा शहरात पोहोचलं असल्याचं इस्राइलने सांगितलं आहे. इस्राइलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी याबात माहिती दिली. “आम्ही गाझा शहराच्या मध्यात आहोत. गाझा हा जगातील सर्वात मोठा दहशतवादी तळ आहे. आम्ही हमासला पूर्णपणे नष्ट करुनच परतणार आहोत”, असं ते म्हणाले. यावेळी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबननला देखील इशारा दिला. “हिजबुल्लाह संघटनेने या युद्धामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करू नये. ती त्यांच्या आयुष्यातील शेवटची चूक असेल”, अशा शब्दांमध्ये नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह संघटनेला इशारा दिला आहे. हिजबुल्लाह ही हमास प्रमाणेच एक संघटना आहे. या संघटनेला इराणचा पाठिंबा मिळालेला आहे.

 

नेतन्याहू पुढे म्हणाले, की जोपर्यंत इस्राइलच्या 240 ओलीस ठेवलेल्या नागरिकांना सोडलं जात नाही, तोपर्यंत शस्त्रसंधीचा विचारही केला जाणार नाही. तसंच, गाझा पट्ट्यात इंधन देखील जाऊ दिलं जाणार नाही.

 


Spread the love

Related posts

२७ लाखांची ठेव बुडण्‍याच्‍या धास्‍तीने ठेवीदाराचा तणावातून मृत्‍यू !

news

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन.

newss

उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच म्हणा! जिल्हाधिकार्‍यांचा आदेश…

news

Leave a Comment