स्टोरी

किल्ले मनोहर गडावर राबविली ‘स्वच्छता मोहिम

Spread the love

ओरोस औद्योगिक प्रशिक्षण आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा उपक्रम

सावंतवाडी:

ओरोस औद्योगिक प्रशिक्षण आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहर गडावर आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ले मनोहर गड स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेत गडावर जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडुपे साफ करण्यात आली. तसेच गडावरच्या वाटेवरील आणि लावलेल्या झाडांच्या भोवताली असलेले गवत काढण्यात आले. गडावरील पाषाणाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच आवश्यक ठिकाणी मार्गदर्शक फलकही लावण्यात आले.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून निमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आयोजित ‘किल्ले स्वच्छता अभियान’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून ओरोस औद्योगिक प्रशिक्षण आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही किल्ले मनोहर गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने उपस्थितीतांना प्रतिष्ठानच्या गड व किल्ले संवर्धन कार्याची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेसाठी शिवापूर गावाच्या सरपंच सौ शेडगे, उपसरपंच श्री राऊळ, अनिल बांग आणि शिवापूर ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

रोटरी क्लब मुंबई – माहीम’ मार्फत वडाचापाट हायस्कुलला प्रिंटर प्रदान 

news

धनगर आरक्षणाचा मुद्दा लांबणीवर!

news

माजी जी प सदस्य संतोष साटविलकर यांचे समाजभान!

news

Leave a Comment