स्टोरी

भोळवली धरणाला कोणताही धोका संभवत नाही!

Spread the love

२९ जुलै वार्ता: कार्यकारी अभियंता गणेश सलगर मंडणगड लघु पाटबंधारे योजना भोळवली धरणाच्या प्रथमदर्शनी गळतीचे प्रमाण पहाता धरणाला कोणताही धोका संभवत नाही. धरणाची पाणीपातळी अल्प झाल्यानंतर गळतीचे ठिकाण निश्चित करून यावर उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी दिली.याविषयीच्या पत्रकात म्हटले आहे की,या धरणातून सद्यःस्थितीत ६.९८२ क्युमेक्स इतका विसर्ग चालू आहे. धरणातील गळतीची पातळी निश्चित करण्यासाठी विमोचकातून २.२० क्युमेक्स विसर्ग चालू करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या समवेत विठ्ठलमंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी धरणावरती पूर्ण वेळ कर्मचारी ठेवण्याची मागणी करण्यात आली. धरणावरती हंगामी दोन पाळीमध्ये कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तथापि ग्रामस्थांच्या मागणीनुसार पावसाळा कालावधीकरता अन्य २ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामामुळे धरणातील गळतीचे प्रमाण मागील हंगामापेक्षा अल्प झाल्याचेही काही ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. प्रथमदर्शनी गळतीचे प्रमाण पहाता धरणास कोणताही धोका संभवत नाही.


Spread the love

Related posts

आमदार पात्रतेविषयीचा निर्णय लांबणीवर, कागदपत्रांसाठी १ आठवड्याची मुदत !

news

कुडाळ- नेरूर येथील रुची संजय नेरुरकर बाल कलाकार पूरस्कार २०२२ ने सन्मानित

news

सीबीआयच्या संचालकपदी आयपीएस प्रवीण सूद यांची नियुक्ती!

news

Leave a Comment