क्राईम

हडपसर (पुणे) येथील ‘इसिस’शी संबंधित आधुनिक वैद्याला अटक!

Spread the love

विविध आतंकवादी संघटनांना साहाय्‍य करत असल्‍याचे उघड!

२९ जुलै वार्ता: येथील नामांकित ‘नोबेल हॉस्‍पिटल’मध्‍ये अनेक वर्षे काम करणारा ४२ वर्षीय भूलतज्ञ डॉ. अदनान अली याला ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्‍याच्‍या प्रकरणी अटक करण्‍यात आली आहे. डॉ. अदनान अली याला राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून (एन्‌आयएकडून) कोंढवा परिसरातून २७ जुलै या दिवशी अटक करण्‍यात आली. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. त्‍याच्‍या कोंढव्‍यातील घरावर धाड घालून ‘इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट्‌स’ आणि ‘इसिस’शी संबंधित अनेक दस्‍तावेज जप्‍त केले आहेत. आरोपी पुण्‍यातील तरुणांचा बुद्धीभेद करून त्‍यांना इसिस या संघटनेमध्‍ये भरती करायचा, अशी माहिती समजली आहे. आरोपीने ‘इस्‍लामिक स्‍टेट’, ‘इस्‍लामिक स्‍टेट ऑफ इराक अँड लेव्‍हंट’, ‘इस्‍लामिक स्‍टेट ऑफ इराक अँड सीरिया’ यांसारख्‍या वेगवेगळ्‍या नावांनी ओळखल्‍या जाणार्‍या ‘इसिस’च्‍या आतंकवादी कारवायांमध्‍ये साहाय्‍य केल्‍याचे समोर आले आहे.मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्‍यानंतर ३ जुलै या दिवशी ‘एन्.आय.ए.’ने इतर ४ जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्‍यातील जुबेर नूर महंमद शेख,अबू नुसैबा आणि ठाणे येथील शरजील शेख आणि झुल्‍फिकार अली बडोदावाला अशी त्‍यांची नावे आहेत.


Spread the love

Related posts

पिस्तूलची धाक दाखवून धमकावणाऱ्या नाशिर शेखवर कारवाई करा….रवी जाधव

news

नवी मुंबईत पुन्हा उघडला ‘माया व्हीआयपी’ बार; रात्री उशिरापर्यंत अश्लील कृत्यांचा धडाका

प्रसाद परब

राजकारण न करता दाऊद शेख याला फाशी देण्‍याची आंदोलन करणार्‍या हिंदु युवतींची मागणी !

news

Leave a Comment