Uncategorizedस्पोर्ट

महाराष्ट्र शासनाकडून क्रीडा पुरस्कारांची घोषणा

Spread the love

१५ जुलै,मुंबई वार्ता: महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणारे क्रीडा पुरस्कार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी ‘सेवासदन’ या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

सन 2019-20, 2020-21 व 2021-22 अशा तीन वर्षांच्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. हे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार आहेत. सन २०१९-२० करिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार हा श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे), सन २०२०-२१ चा पुरस्कार दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन २०२१-२२ चा पुरस्कार आदिल जहांगिर सुमारीवाला (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ३ जणांना, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 13 जणांना, जिजामाता पुरस्कार ( क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ) 1, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू ) 81 जणांना, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार 5 जणांना, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) 14 जणांना जाहीर झाले आहेत.

यावेळी मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जात आहे. या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.


Spread the love

Related posts

त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरूपिठामध्ये २३ जुलैपासून याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन

news

रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका समृद्धी संजय पिळणकर – मूननकर यांचा ‘महाराष्ट्र शैक्षणिक सेवारत्न पुरस्काराने सन्मान…

news

गोव्यात प्रथमच ‘सी 20 परिषदे’चे आयोजन!

news

Leave a Comment