स्टोरी

दशावतार कलाकार विराज माळगावकर याला परब मराठा समाजाच्या वतीने रोख स्वरूपात आर्थिक मदत!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): परब मराठा समाजाच्या वतीने माळगाव येथील दशावतार कलाकार विराज माळगावकर याला नुकतेच रोख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. दशावतार कलाकार विराज मागावकर याची आर्थिक परिस्थिती खालावल्याने आणि राहते घर नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. नुकतीच विराज याच्या आईचे सुद्धा निधन झाले होते. विराज याला या सर्व परिस्थितीमुळे मोठ्या कष्टाचा सामना करावा लागत होता.या सर्वांचे परब मराठा समाजाला कळतात कोणताही भेदभाव न ठेवता परब मराठा समाजाच्या वतीने विराज याला त्याच्या घरी जाऊन रोख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब, सिंधुदुर्ग जिल्हा परब मराठा समाज संघटक विनायक परब, माजी कार्याध्यक्ष प्रकाश परब, मालवण तालुका परब मराठा समाज संघटक जयद्रथ परब, मानवधिकार समिती जिल्हा सचिव अर्जुन परब, आमडोस माजी सरपंच दिलीप परब, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर आणि परब मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपली गरज ओळखून परब मराठा समाजाने योग्य वेळी जे आर्थिक स्वरूपात सहकार्य केले आहे त्याचे रूण विराज माळगावकर यांनी व्यक्त करून सर्वांचे आभार वेक्त केले.

विराज माळगावकर याला त्याचे घर नूतनीकरण करण्याप्रसंगी वस्तू रुपात योग्य ते सहकार्य परब मराठा समाजाच्या वतीने करण्याचा मानस डॉक्टर दीपक मुळीक परब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. श्री जययद्रथ परब यांनी विराज याच्या पाठीशी परब मराठा समाज कायम राहील असेही अभिवचन या वेळी दिले.

फोटो: परब मराठा समाजाच्या वतीने दशावतार कलाकार विराज माळगावकर याला आर्थिक मदत देताना डॉक्टर दीपक परब, विनायक परब आणि मान्यवर


Spread the love

Related posts

आंगणेवाडी येथे २५ फेब्रुवारीला “डार्लिंग डार्लिंग” नाट्यप्रयोग!

news

रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार…!

news

वेंगुर्ला – बेळगाव रोड येथे प्रॉपर्टी विकणे आहे!

news

Leave a Comment