राजकारण

मी त्‍यागपत्र देणार या अफवा! मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

७ जुलै वार्ता: मी त्‍यागपत्र देणार या अफवा आहेत. विरोधकांकडून त्‍या पसरवल्‍या जात आहेत. सर्वसामान्‍य घरातील माणूस मुख्‍यमंत्री झाला, ही पोटदुखी आहे. सरकारच्‍या शपथविधीपासून ते सरकार पडेल म्‍हणत आहेत. अफवांच्‍या मर्यादा तोडल्‍या आहेत. विरोधकांनी प्रथम त्‍यांची घरे सांभाळावीत, असे वक्‍तव्‍य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाहिनीशी बोलतांना केले.ते पुढे म्‍हणाले की, शिवसेनेत कुणीही अप्रसन्‍न नाही. आम्‍ही विकासासमवेत आहोत. सर्वांगीण विकासाला अडचण येत नाही. अजितदादांनीही विकास पाहिला. त्‍याला साथ दिली. त्‍यांना विकासाची भूमिका पटली. अजितदादांनी उघडपणे सांगितले की, मोदींचे नेतृत्‍व सक्षम नेतृत्‍व आहे. ते विकासाला साथ देत आहोत. त्‍यामुळे सरकार मजबूत झाले आहे. पुढे आणखीन मजबुतीने काम होईल. आज २०० हून अधिक विधेयके आहेत. दोन इंजिनचे मजबूत सरकार आहे. मागच्‍या सरकारने बंद पाडलेले सर्व प्रकल्‍प आम्‍ही चालू केले. आमचे ध्‍येय सर्व सामान्‍य माणसाला पुढे नेणे आहे.


Spread the love

Related posts

महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे! सरकारच्या वतीने त्यांना जे चांगले देता येईल ते देण्याची आमची जबाबदारी आहे! देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्का..!

news

अमृता फडणवीस लाच प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया !

news

Leave a Comment