स्टोरी

४५ ते ६० वयोगटातील अविवाहहीतांना मिळणार पेन्शन!

Spread the love

६ जुलै वार्ता: ४५ ते ६० वयोगटातील ज्या पुरुषांचे आणि महिलांचे लग्न झालेलं नाही त्यांना हरयाणा सरकारकडून २,७५० रुपयांची मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या अविवाहित पुरुष आणि महिलेचे वार्षिक उत्पन्न हे १.८० लाखांच्या आत आहे, त्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज हि घोषणा केली आहे. हरयाणा राज्य सरकारने सांगितले की, ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.८० लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच याचा योजनेचा लाभ मिळणार आहे.

हरयणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (संग्रहित छायाचित्र)

ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील सुमारे १.२५ लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे. हरियाणामध्ये वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाते. राज्य सरकारने वृद्धापकाळ निवृत्ती वेतन ३००० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हरयाणामध्ये होणाऱ्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर लोकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री हरियाणाचे मनोहरलाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.


Spread the love

Related posts

मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो! मुंबई पोलीस

news

मुंबई – गोवा महामार्गाच्‍या कामाच्‍या पूर्ततेअभावी रायगडमधील पत्रकारांचे १२ सप्‍टेंबरला आंदोलन !

news

माणगांव वाचनालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न!

news

Leave a Comment