स्टोरी

कल्याण पूर्वेत माता रमाई भिमराव आंबेडकर वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण!

Spread the love

आमदार गणपत गायकवाड यांच्या आमदार निधीतून निर्मिती.

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार गणपत गायकवाड यांच्या विशेष विकास निधीतून कल्याण पूर्व – माता रमाबाई आंबेडकर चौकात नागरीकांसाठी विनामुल्य वृत्तपत्र वाचनालय सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयाचे औपचारीक लोकार्पण आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जेष्ठ समाज बंधु अण्णासाहेब रोकडे यांचे हस्ते फित कापून करण्यात आले. बहुजन विकास सेवा संस्था संचालित माता रमाई भीमराव आंबेडकर वृत्त पत्र वाचनालयाच्या या लोकार्पण समयी अनेक मान्यवर उपस्थित होते.

बहुजन विकास सेवा संस्थेच्या मागणीनुसार माता रमाबाई स्मारकाच्या बाजुला सुमारे ४५ फुट लांब आणि ६ फुट रूदीच्या पत्राशेड मध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या वाचनालयात संदिप तांबे यांच्या संकल्पनेतून संत शिरोमणी रोहीदास, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले आणि स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे या महापुरुषांचे त्रिमिती शिल्प साकारण्यात आले आहे .या लोकार्पण सोहळ्या समयी आमदार गणपत गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, या वाचनालयात वृत्त पत्रांतून प्रती दिनाच्या जगभरातील घडामोडींची माहिती मिळेलच परंतु याच बरोबर या ठिकाणी महापुरुषांच्या शिल्पांमुळेही वाचक प्रेमींना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळणार आहे. या वाचनालयाचे संवर्धन आणि पावित्र राखण्यात बहुजन विकास सेवा संस्था कसल्याही प्रकारे कमी पडणार नाही याचा मला विश्वास आहे असेही ते म्हणाले .या समयी प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सौ . सविता हिले,महादेव रायभोळे ,संजय मोरे , सुबोध भारत, अमित सोनवणे, केतन रोकडे, अशोक भोसले, राजू रोकडे, , राजु अंकुश, रवी देवळे, अनिल एटम, उदय गायकवाड, कुशल निकाळे, प्रमोद सोनकांबळे, दिपक गायकवाड, संजय देवळेकर, मनोज भोसले, गणेश अहिर, सिंधुताई मेश्राम आदी समाज बांधव आणि परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Spread the love

Related posts

गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचे ऑनलाईन भुमिपूजन!

news

भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये ५० पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले.

news

मळगाव काही भागात चार दिवस वीजपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थ संतप्त 

news

Leave a Comment