स्टोरी

कोकण किनारपट्टीसह राज्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळाची शक्यता.

Spread the love

६ जून वार्ता: अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या २४ ते ४८ तासांत या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या वादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळू शकतो. अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील २४ ते ४८ तासांत उत्तरेकडे सरकण्याचा आणि अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रीवादळात रुपांतर होऊन ८ ते ९ जूनदरम्यान हे चक्रीवादळ तीव्र होऊ शकते. यावेळी समुद्र खवळलेला असेल आणि वाऱ्याचा वेग ताशी ९० किमी इतका असू शकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.


Spread the love

Related posts

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे चौकुळ चिखलव्हाळ बेरडकीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप..!

news

येत्या ४८ तासांत मान्सून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार

news

एस. आर. वाय. प्रोडक्शनचे ‘गणपती बाप्पा तुम्ही लवकर या’ गाणे प्रदर्शित!

news

Leave a Comment