स्टोरी

चांद्रयान-३ चे १२ जुलै रोजी प्रक्षेपण होणार!

Spread the love

२९ मे वार्ता: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अधिकृत माहितीनुसार चांद्रयान -२ च्या अपयशानंतर चांद्रयान-३ ची घोषणा झाल्यानंतर आता हे चंद्रयान प्रक्षेपण करणाच्या तयारीत आहे. १२ जुलै रोजी चांद्रयान-३ चे प्रक्षेपण होणार आहे. हे यान २३ ऑगस्टपर्यंत चंद्रावर उतरणार आहे. इस्रोने २०१९ मध्ये चांद्रयान २ प्रक्षेपित केले होते. अंतराळ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल स्पेस एजन्सीच्या बंगळुरूस्थित मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत संदर्भात माहिती दिली आहे.

चांद्रयान-३(संग्रहित छायाचित्र )

‘चांद्रयान-३’ मोहीम ही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नियोजित करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी GSLV Mark ३ या प्रक्षेपकाद्वारे हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवले जाणार आहे.लँडर आणि रोव्हरवरील या वैज्ञानिक उपकरणांची व्याप्ती ‘सायन्स ऑफ द मून‘ या ‘थीम’वर काम करेल. आणखी एक प्रायोगिक साधन चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या “स्पेक्ट्रोपोलरीमेट्रिक” चा अभ्यास करणार आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. इतकेच नाही तर चांद्रयान ३ ची स्पर्धा रशियन वाहन लुना २५ शी देखील होणार आहे.

चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर होते. तर चांद्रयान ३मध्ये तिसऱ्या टप्प्यात लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल असतील. सध्या चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. यासंबंधीच्या सर्व चाचण्या मार्चमध्येच झाल्या आहेत. चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे, भूकंपाच्या हालचाली वर लक्ष ठेवणे अशा अनेक गोष्टी अभ्यासल्या जाणार आहेत.


Spread the love

Related posts

महाराष्ट्रातील २८ दूध योजना आणि ६५ शीतकरण केंद्रे यांतील यंत्रसामग्री भंगारात*

news

जय जय राम कृष्ण हरी! सार्थ हरिपाठ!

news

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कारांचे वितरण दिमाखदारपणे संपन्न

news

Leave a Comment