स्टोरी

खा. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिव्यांगांना दिला तीन चाकी सायकलींचा आधार!

Spread the love

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी ३ दिव्यांगांना इतरत्र हिंडण्या फिरण्यासाठी ३ चाकी सायकली भेट दिल्याने या दिव्यांगांच्या चेहर्‍यावर हसू खुलल्याचे दिसून आले. कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयातकल्याणचे रहिवाशी अशोक विठ्ठल कडू, शांती नगर उल्हास नगरचे दिपक कीसन चव्हाण आणि आशेळे गांवचे सुदर्शन शिवशंकर या दिव्यांगांना इतरत्र ये – जा करण्यासाठी प्रत्येक एक या प्रमाणे ३ चाकी सायकली देण्यात आल्या.

आपल्या परिवारा पैकी रक्ताच्या नात्यातील एका सदस्याचे नुकतेच निधन झाले असतांनाही आणि या दुःखातून आपला परिवार अद्यापही बाहेर पडला नसतांनाही सामाज सेवेचा वसा अबाधीत ठेवत दिव्यांगांना मदतीचा हात देणारे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या या समाज कार्याचे लाभार्थी दिव्यांगांनी कौतुक करीत त्यांचे आभार मानले. या समयी शाखा प्रमुख प्रशांत बोटे, निलेश रसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

आपण खरा इतिहास विसरलो आहोत, हे दुर्दैवी ! – सुहास क्षीरसागर, अध्‍यक्ष, समर्थ सेवा मंडळ

news

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या!

news

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक आमच्या ताब्यात द्या! आनंद शिंदे….

news

Leave a Comment