स्टोरी

नवे पारगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील ग्रामपंचायतीचा दुकानदारांनी शीतपेय विक्री न करण्‍याचा ठराव! नवे पारगाव ग्रामपंचायतीचा स्‍तुत्‍य निर्णय !

Spread the love

१० एप्रिल (वार्ता): शीतपेयांमध्‍ये ‘कॅफिन’ वापरलेले आढळून येते. ही पेये घेण्‍याचे प्रमाण १८ वर्षांखालील युवकांमध्‍येे अधिक आढळून आले. यामुळे युवकांच्‍या आरोग्‍यास धोका निर्माण होऊ शकतो. तरी नवे पारगाव येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत चर्चा करून कोणत्‍याही दुकानदाराने गावात शीतपेयाची विक्री करू नये, तसेच त्‍याचे विज्ञापन त्‍यांच्‍या दुकानासमोर करू नये, असा ठराव केला आहे. अशी विक्री करतांना दुकानदार आढळल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍याची चेतावणीही सरपंचांनी नोटिसीद्वारे दिली आहे.‘अनेक चित्रपट अभिनेते, खेळाडू शीतपेयांचे विज्ञापन करतांना दिसतात; मात्र त्‍या पेयांतून काहीच लाभ होत नसल्‍याचे संशोधनांतून उघड झाले. यापेक्षा तरुणांनी ताक, उसाचा रस, लिंबू सरबत, मठ्ठा अशा स्‍वदेशी पेयांकडे वळावे. नवे पारगावप्रमाणे अन्‍य ग्रामपंचातींमध्‍येही असा निर्णय व्‍हावा’, अशी मागणी ग्रामस्‍थ आणि नागरिक करत आहेत.


Spread the love

Related posts

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा!

news

कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार!

news

खोटले येथे १० रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव!

news

Leave a Comment