स्टोरी

गेल्या ५ महिन्यात नाशिक येथून ९५६ मुली आणि महिला बेपत्ता! पोलिसांच्या अहवालातील माहिती….

Spread the love

नाशिक: येथून प्रतिदिन २ – ३ मुली बेपत्ता होत आहेत. जानेवारी ते ८ मे २०२३ या कालावधीत येथून ९५६ मुली आणि महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडे आहे. नाशिक पोलिसांच्या प्रतिदिनच्या गुन्ह्याच्या संदर्भातील अहवालातून ही आकडेवारी समोर आली. ९५६ पैकी २२१ मुली अल्पवयीन आहेत, तर १८ वर्षांपुढील महिला ७३५ आहेत. पोलिसांना केवळ ३१ अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. आहे. उर्वरितांचा शोध चालू आहे.नोकरी, विवाह, कौटुंबिक कलह, सामाजिक प्रसारमाध्यमांचा अतीवापर, प्रियकराकडून लग्नाचे आमीष, विवाहबाह्य संबंध, प्रेमाचे आमीष दाखवून मुलींची केली जाणारी दिशाभूल ही कारणे या बेपत्ता होण्यामागे असावीत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? या विषयाकडे आताच गांभीर्याने पहायला हवे.


Spread the love

Related posts

तलाठी भरतीत १४५ जागांपैकी जिल्ह्यातील फक्त ४ जण तलाठी परीक्षेत पात्र:

news

समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी महामृत्यूंजय जप केल्याबद्दल गुन्हा दाखल करणे निषेधार्ह! श्री. सुनील घनवट

news

मिठबाव येथे कै. डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या ७५ वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम…!  

news

Leave a Comment