स्टोरी

संबोधी बुध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचा संयुक्त जयंती उत्सव उत्साहात साजरा….

Spread the love

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव कल्याण पूर्वेतील संबोधी बुध्द विहाराच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कालकथीत वसंतशेठ सोनवणे यांनी स्थापन केलेल्या श्री मलंग रोड वरील संबोधी बुद्ध विहारात या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . तथागात गौतम बुध्द यांच्या २५६७ व्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या या जयंती उत्सवाच्या सकाळच्या सत्रात प्रारंभी बौध्द धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील ध्ववजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भंतेजी दिनकर यांनी धम्मदेशने तून उपस्थितांना बौध्द धम्माची महती पटवून दिली .सायंकाळी मनोरंजनातून समाज प्रबोधन व्हावे या उद्देशाने विजय विटे संचालित ‘सप्तसूर महाराष्ट्राचा’ या गित – संगित प्रधान कार्यकमातून डाँ . बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या जिवनावर आधारीत गिते सादर करून उपस्थितांचे मनोरंजातून प्रबोधन करण्यात आले . या संगीतमय कार्यक्रमाचे सुत्र संचलन अभिनेते सुनिल जगताप यांनी केले.

सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमा दरम्यान उद्योगपती अमित सोनवणे, सुनील सोनावणे, शहर प्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक नवीन गवळी, मोरेश्वर भोईर, समाज सेवक हरिभाऊ भालेराव , धर्मा वक्ते ,मिलिंद शहारे, केतन रोकडे, , प्रशांत बोटे, रमेश केदारे ,भारती जाधव,अशोक भोसले, प्रियेश सोनावणे, जयेश सोनावणे, प्रशांत कासारे, मिलिंद सकपाळ, पराग मेंढे, तुशार जाधव,सचिन साळवे, राहुल हुंबरे, शेखर केदारे, अलका साळवे, आयुष्यमती तिरपुडे ताई,प्रशांत भंडारे, राजेश गवळी आदी मान्यवरांचा संयोजन समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, सचिव भास्कर पडघणे, कोषाध्यक्ष रावसाहेब इंगळे, कार्याध्यक्ष मिलींद तोरणे यांचे सह संबोधी बुध्द विहार व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.


Spread the love

Related posts

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येतातच स्वच्छ व सुंदर सावंतवाडी बनवण्याचे काम नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी हाती घेतले.

newss

नवभारत घडविण्यासाठी विद्यामंदिर माध्य प्रशाळेने लोकसंगीत व लोकगीतातून दिला साक्षरतेचा संदेश

news

आडवली समर्थ गड येथे १० एप्रिल पासून स्वामी समर्थ जयंती उत्सव!

news

Leave a Comment