क्राईम

ओव्हरलोड खडी आणि वाळू वाहतूकिकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्गकडून दुर्लक्ष!

Spread the love

सिंधुदुर्ग: – जिल्ह्यातून गोवा येथे भरधाव वेगाने ओव्हरलोड खडी आणि वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून सुद्धा उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्गकडून दुर्लक्ष केले जात आहे. सात दिवसांची मुदत देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ओव्हरलोड वाहतूकिविरोधात दि. ४ एप्रिल दिवशी इन्सुली तपास नाक्यावर बेमुदत उपोषण सुरू करणार. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्ग जबाबदार राहणार असल्याचा इशारा शिवसेना (ठाकरे गट) इन्सुली मतदारसंघ विभागप्रमुख फिलिप्स यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना दिला आहे..निवेदनात म्हटले कि,तपास नाक्यावरून तसेच नजीकच्या इतर गावातून राजरोसपणे ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. काही वेळा दोन ब्रासची रॉयल्टी भरून चार ब्रासची वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून संबंधित कंपन्या स्वतःच्या तिजोऱ्या भरत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस सुरू असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी सदर ठिकाणी लहान मोठे अपघातही वाढले आहेत तसेच वाहने भरधाव वेगाने जात असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक सात दिवसांच्या आत बंद करावी अशी मागणी फिलिप्स रॉड्रिक्स यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. परंतु अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शाळकरी विद्यार्थी, नागरिक व प्रवासी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. दिलेल्या निवेदनात फिलिप्स रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे.


Spread the love

Related posts

बनावट भारतीय चलन प्रकरणी एनआयएने मोठी करावाई

news

शासकीय वनात भेडल्यामाडची पाने काढणाऱ्या आरोपींवर फिरते पथक सावंतवाडी टीमची कारवाई..!

news

सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे व उपनिरिक्षक सुरज पाटील निलंबित…

news

Leave a Comment