स्टोरी

मळगाव वाचनालयाकडून २६ ऑगस्टला कै.डॉ.अरविंद खानोलकर श्रद्धांजली सभेचे आयोजन.

Spread the love

मळगाव: वैद्यकीय क्षेत्रातील ‘देवमाणूस’ कै. डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर यांचे दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले असून कै.उदय खानोलकर वाचनालय मळगाव तर्फे बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता वाचनालयाच्या रमाकांत खानोलकर सभागृहात कै. डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे. “सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका” या त्यांच्या शिकवणुकीला उजाळा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.सहा दशकांपर्यंत अविरत रुग्णसेवा करणारे, निधनाच्या तीन दिवस आधीपर्यंत रुग्णांची सेवा करणारे, गरजू, हरिजन-गिरिजन बांधवांना मोफत उपचार देणारे, सेवाभावी, संवेदनशील आणि दातृत्वशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. खानोलकर. त्यांचे जाणे म्हणजे केवळ एका डॉक्टरचे जाणे नाही, तर माणुसकीला धर्म मानणारा एक आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा, सेवाभावाचा वारसा पुढे नेण्यासाठी श्रद्धांजलीपर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

टोलवसुली’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा ! – राज ठाकरे

news

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा.

news

सर्व विभागांमध्‍ये राज्‍य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्‍त करावे! – मुख्‍यमंत्री

news

Leave a Comment