मुणगे ता.२२: येथील सावंतवाडीतील ग्रामंस्थ रुपेश तेली यांच्या घराजवळील माडबागायती मध्ये साफसफाई करताना देवगांडूळाची अंडी आढळली आहेत. मुणगे सावंतवाडी येथे रूपेश तेली आपल्या घराजवळील माडबागेत साफसफाई करत असताना पारदर्शक व गजऱ्याच्या आकाराची अंडी दिसून आली. अंड्यासोबत सापांसारखा एक जीव दिसून आला. तेली यांनी गावातील दादा वळंजू यांना याबाबत माहिती दिली. वळंजू यांनी वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींकडून याबाबत माहिती करून घेतली. तेव्हा ही अंडी देवगांडूळ (सिसीलियन) या उभयचर प्राण्याची असल्याचे निष्पन्न झाले. हा देवगांडूळ bombay caecilian या प्रजातीचा आहे.या प्राण्याला मराठीत देवगांडूळ आणि इंग्रजीत सिसीलियन ( caecilian) असे म्हणतात. सापांप्रमाणे त्यांना पाय नसतात, त्यामुळे ते सरपटत चालतात. सापांसारखे दिसत असले तरी सापांपेक्षा खूप वेगळे आहेत. देवगांडूळ हे उभयचर आहेत. थोडक्यात बेडकांच्या गटात मोडतात. त्यांची अंडी बेडकाच्या अंड्यासारखी पारदर्शक व आकाराने थोडी मोठी असतात.

देवगांडूळाच्या प्रजाती खूप दुर्मीळ असून सहसा कोकणात आढळतात. त्यांना बेडकांप्रमाणे पाणी आणि ओलसर जागेची गरज असते. रूपेश तेली व दादा वळंजू यांनी या दुर्मिळ सजीवाबद्दल सर्वांना माहिती करून दिली व त्याच ठिकाणी त्यांचे संवर्धन केले ही कौतुकास्पद बाब आहे.फोटोसह प्रसिद्ध करणेमुणगे येथील सावंतवाडीतील शेतकरी रुपेश तेली याना .आपल्या माड बागायतीची साफसफाई करताना आढळल्या ,देवगांडूळ जाती अंडी सापडल आहेत या अड्यांची पाहणी करताना पाहणी ग्रामपंचायत डाटा आँफरेटर दादा वळंजू सोबत रुपेश तेली आदी.़
