स्टोरी

कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी मध्ये जलसंधारण दिन साजरा.

Spread the love

सावंतवाडी: शासनाच्या आदेशानुसार २१ ऑगस्ट हा माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ही जलसंधारण दिन म्हणून कळसुलकर हायस्कूल मध्ये साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी जलसंधारण प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देण्यात आली.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जीवन प्रसंग तसेच कार्याचा आढावा घेतला. यावेळी पर्यवेक्षक श्री सुबोध वराडकर, ज्येष्ठ शिक्षिका सौ सुष्मिता चव्हाण, सांस्कृतिक प्रमुख श्री दिगंबर सारंग, उच्च माध्यमिक प्रमुख श्री उत्तम पाटील, सहाय्यक शिक्षक सिद्धेश कुलकर्णी, विज्ञान शिक्षिका सौ सोनाली बांदेलकर, संगीत शिक्षिका तन्वी मेस्त्री, श्री अनिल ठाकूर तसेच पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक तथा संस्कृतिक समिती सदस्य श्री अनिल ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती सोनाली बांदेलकर यांनी मानले.


Spread the love

Related posts

कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यामध्ये असेंट टेक्नो सोल्युशनचे मोठे योगदन लाभेल! : आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन

news

देश अन् धर्म वाचविण्याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का? अधिवक्ता सुभाष झा

news

सौ. सुहासिनी विजय परब यांचे निधन.

news

Leave a Comment