स्टोरी

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत आयोजित करण्यात आलेली “भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा सन २०२२/२३ रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी होणार!

Spread the love

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत आयोजित करण्यात आलेली “भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा सन २०२२/२३ “रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी तालुका परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे .सदर परीक्षेला इयत्ता चौथी व सातवीचे जे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत त्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तरी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळीच उपस्थित राहावे. परीक्षा रविवार दिनांक २६ मार्च २०२३ पेपर १ इयत्ता चौथी व सातवी, परीक्षेची वेळ सकाळी ११ ते १२:३०, पेपर २ इयत्ता चौथी व सातवी, परीक्षेची वेळ दुपारी २:०० ते ३:३०.

इयत्ता चौथीसाठी परीक्षा केंद्रे खालीलप्रमाणे 1)तालुका कणकवली- विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली 2) तालुका कुडाळ- कुडाळ हायस्कूल कुडाळ 3)तालुका सावंतवाडी- आर पी डी हायस्कूल सावंतवाडी 4)तालुका मालवण -अ शी दे टोपीवाला हायस्कूल मालवण 5)तालुका वैभववाडी- श्री माधवराव पवार विद्यालय कोकीसरे, 6) तालुका वेंगुर्ला -आर के पाटकर हायस्कूल वेंगुर्ले आणि उपकेंद्र -मदर तेरेसा इंग्रजी माध्यम शाळा वेंगुर्ले 7) दोडामार्ग-दोडामार्ग इंग्लिश स्कूल ,दोडामार्ग 8) देवगड -शेठ म ग हायस्कूल देवगड

इयत्ता सातवी साठी परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे 1) तालुका- कणकवली- एस एम हायस्कूल कणकवली 2) तालुका कुडाळ- क म शि प्र मंडळाचे इंग्रजी माध्यमाची शाळा कुडाळ 3) तालुका सावंतवाडी- मिलाग्रीस हायस्कुल 4) तालुका मालवण- भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवण 5) तालुका वैभववाडी- श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे 6) तालुका वेंगुर्ले -वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ले 7) तालुका दोडामार्ग- साटेली भेडशी हायस्कुल 8) तालुका देवगड- श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल जामसंडे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट ,शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड सोबत आणावे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शालेय गणवेशात उपस्थित रहावे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी त्या त्या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वेळीच उपस्थित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी घ्यावी.

महेश धोत्रे शिक्षणाधिकारी( प्राथमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग


Spread the love

Related posts

सतीश मुणगेकर राज्यस्तरिय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

news

त्र्यंबकेश्वर येथील श्रीगुरूपिठामध्ये २३ जुलैपासून याज्ञिकी प्रशिक्षणाचे आयोजन

news

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उद्या होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा..! रवी जाधव

newss

Leave a Comment