राजकारण

पालकमंत्री नितेश राणे आपण आपल्या भावाला अजून किती पाठीशी घालणार? माजी आमदार वैभव नाईक

Spread the love

सिंधुदुर्ग: शिवसेना आमदार निलेश राणे यांनी धर्मांतरावरून ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपचे पदाधिकारी लॉरेन्स उर्फ म्हातु मान्येकर यांनी काल पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. त्याबाबतची बातमी देखील प्रसारित झाली आहे. मात्र या बातमीवरून पालकमंत्री नितेश राणेंनी आपल्या भावाच्या भूमिकेबद्दल सारवासारव करत कार्यकर्त्यांना दिलासा दिल्याचे समजते. परंतु याआधी भाजपचे पदाधिकारी रणजित देसाई यांना सुद्धा आमदार निलेश राणेंनी धमकी दिली होती. त्याचबरोबर भाजपचे विजय केनवडेकर यांच्या घरात निलेश राणे घुसले होते. आता निलेश राणेंनी पुन्हा भाजपच्या लॉरेन्स मान्येकर यांना धमकी दिली आहे. मात्र तरीही पालकमंत्री नितेश राणे हे आपल्या भावाची पाठराखण करून सारवासारव करीत आहेत. असं उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. तसेच पालकमंत्री नितेश राणे आपल्या भावाच्या भूमिकांची अजून किती सारवासारव करणार? त्यांना किती पाठीशी घालणार? असा सवालहि उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.


Spread the love

Related posts

स्वतःच्या आमदारकीसाठी सामंत बधुंच्या विरोधात भूमिका घेणारे केसरकर हे कोणाचेच होऊ शकणार नाहीत! योगेश धुरी 

news

ठाकरे गटाचे शरद कोळी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

news

देशात बदलाचा मूड, उद्याच्या निवडणुकीत परिणाम दिसणार; शरद पवार यांचं मोठं विधान

news

Leave a Comment